युवक बिरादरीच्या वतीने क्रांती दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन

0
13

● पंकज इंगोले यांचा सत्कार

भंडारा:युवक बिरादरी (भारत) ही संस्था सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा क्रांती दिन तथा युवक बिरादरीच्या स्थापना दिनानिमीत्त भंडारा युवक बिरादरीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी 8.30 वा हुतात्मा स्मारक भंडारा येथे शहिदांना पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन करण्यात येणार आहे. आणि हुतात्मा स्मारक ते गांधी चौक मार्गे मशाल रॅली काढण्यात येईल. त्यानंतर सार्वजनिक वाचनालय भंडारा येथे 9 वा. क्रांतीस्वर देशभक्तीपर समूहगीत स्पर्धा आणि दुपारी 1 वा. देशभक्तीपर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. संध्या. 5 वा. सत्कार समारोह तथा पारितोषिक वितरण कार्यक्रम आहे.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस अधीक्षक लोहित मतानी, ज्येष्ठ रंगकर्मी निळकंठ रणदिवे, जिल्हा मध्य. बॅंकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, सार्वजनिक वाचनालय भंडाराचे अध्यक्ष धनंजय दलाल, उपजिल्हाधिकारी नरेश वंजारी, डॉ. ओमप्रकाश गिऱ्हेपुंजे, निमाचे जिल्हाध्यक्ष डॉ. चंद्रकांत निंबार्ते, इंद्रपाल बोंद्रे, राजेंद्र भांडारकर असणार आहेत.

युवक बिरादरी (भारत) संस्थेच्या कार्य. महासंचालकपदी निवड झाल्याबद्दल वरीष्ठ पत्रकार, बिरादर तथा भंडारा युवक बिरादरीचे माजी अध्यक्ष पंकज इंगोले, युवक बिरादरीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल प्रशांत वाघाये आणि नागपूर युवक बिरादरीच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल काजल फुंडे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

सदर कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन भंडारा युवक बिरादरीच्या अध्यक्षा सरिता फुंडे, कार्याध्यक्ष सुरेंद्र कुलरकर, संचालक वर्षा मनोज दाढी, विक्रम फडके, वैभव कोलते, मोरेश्वर समरीत, राधेश्याम बांगडकर, प्रणित उके, मेघा भागवत, नेहा शेंडे, यशपाल कराडे, सागर ठाकरे, प्रणोती नेवारे, यांच्या वतीने करण्यात आले आहे.