
अर्जुनी मोर-स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा समारोप मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत ग्रामपंचायत माहूरकुडाच्या वतीने 12 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या प्रांगणात शीला फलकाचे अनावरण करण्यात आले.ध्वजारोहण वृक्षारोपण सोबतच पंचप्रण शपथ घेऊन सदैव कर्तव्यदक्ष राहण्याचा संकल्प केला.अध्यक्षस्थानी सरपंच लक्ष्मीकांत नाकाडे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक नीलकंठ चिंतामण ठाकरे,कृष्णा रामदास पाटणकर, अर्जुनी मोर पंचायत समिती सभापती सविता कोडापे, पोलीस पाटील चोप्राम ठाकरे, उपसरपंच सौ उज्वलाताई डोंगरे, ग्रामपंचायत सदस्य अलका पंधरे, तंटामुक्त समिती अध्यक्ष चंदूभाऊ शहारे, सौ भूमिता डोंगरे, सौ शिलाबाई शहारे, सौ चंदाताई वंजारी,अनिल कापगते,नलू नाकाडे, डाँ. सुखदेवे,आरोग्य सेविका अस्मिता लोणारे, ग्रामसेवक समीर रामटेके ,संगदीप भैसारे ,संतोष रोकडे आरोग्य सेवक श्री चाकाटे, मुख्याध्यापक के आर हातझाडे, मोडकू राऊत, योगिता पाटणकर, केंद्रप्रमुख बी एन बोरकर, कृषी सहाय्यक यशवंत कुंभरे व इतर मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविकातून ग्रामसेवक समीर रामटेके यांनी कार्यक्रमाचा उद्देश समजावून सांगितले. सरपंच लक्ष्मीकांत नाकाडे यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमाच्या अनुषंगाने माझी माती माझा देश हा उपक्रम विविध माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावर गावकऱ्यांच्या सहकार्यातून राबविला जात असून सर्वांनी देशाप्रती अभिमान बाळगून देशसेवा करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे संचालन शिक्षक श्री नाकाडे तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक के आर हातझाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण माहूरकुडावासिय जनतेने अथक परिश्रम घेतले.