
*अध्यक्ष बच्चू कडू यांच्या हस्ते उद्घाटन
विविध योजनांचा मिळणार लाभ
गोंदिया- दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानाअंतर्गत १७ ऑगस्ट रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, मरारटोली, गोंदिया येथे जिल्हास्तरीय शिबीर आयोजित करण्यात आले आहे.राज्यात ६ जून २०२३ पासून राबविण्याचे शासन स्तरावरुन ठरविण्यात आलेले आहे. या अभियानाचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शन आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चु कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत हे शिबिर होणार आहे.
दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानांतर्गत विविध विभागांमार्फत दिव्यांगांसाठी राबविण्यात येणा-या योजनांची माहिती दिव्यांग व्यक्तींपर्यंत पोहोचावी तसेच योजनांचा लाभ दिव्यांगांना एकाच ठिकाणी मिळावा यासाठी जिल्हास्तरीय शिबीराचे आयोजन १७ ऑगस्ट रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, मरारटोली, गोंदिया येथे करण्यात आलेले आहे. या एक दिवसीय शिबीरामध्ये आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चु कडू हे स्वतः उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते या अभियानाचे उद्घाटन सकाळी ११.०० वाजता करण्याचे आयोजिले आहे.
सदर अभियानामध्ये प्रत्येक विभागास स्टॉल उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्यामध्ये विभागांतर्गत राबविण्यात येणा-या योजनांबाबतची माहिती व प्रचार प्रसिध्दी करण्यात येणार असून पात्र दिव्यांग लाभाथ्यांचे अर्ज त्याच ठिकाणी भरुन घेण्यात येणार आहे. त्याकरिता शिबीरामध्ये येणा-या दिव्यांग लाभाथ्र्यांनी दिव्यांगत्व प्रमाणपत्र (UDID प्रमाणपत्र). आधार कार्ड, आयु संबंधी प्रमाणपत्र (जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला), पासपोर्ट फोटो ०३, उत्पन्नाचा दाखला (Income certificate) इत्यादी आवश्यक दाखले मुळ प्रमाणपत्रांसह सोबत घेवून यावे व जास्तीत जास्त दिव्यांगांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद संजय गणवीर यांनी केले.