अरुणनगर जिल्हा परिषद शाळेला जि.प.उपाध्यक्षांची आकस्मिक भेट

0
17

अर्जुनी मोरगाव,दि.13-तालुक्यातील अरुणनगर शाळेला शुक्रवारला जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण क्रीडा व आरोग्य इंजि यशवंत गणविर यांनी आकस्मिक भेट देत पाहणी केली.
या भेटीदरम्यान शाळेतील भौतिक व मूलभूत सुविधांची पाहणी करण्यात आली.शाळेत प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी हितगुज साधले.त्यांच्या चर्चा करुन प्रश्नोत्तराचा तास घेऊन विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती पडताळुन घेतली.
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गरीब, कष्टकरी कामगार व शेतमजुरांची मुले शिक्षण घेण्यासाठी येतात.शिक्षकांना गलेलठ्ठ पगार मिळतो तरी जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची प्रगती का होत नाही असा सवाल उपस्थित शिक्षकांना यावेळी केला. ज्याप्रमाणे आपण आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे अशी अपेक्षा बाळगतो मग या गरीब होतकरू विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देऊन गुणवंत विद्यार्थी घडविण्याची सुचना यावेळी दिली.

या भेटीप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या जयश्री देशमुख, शाळा समितीचे अध्यक्ष जतीन मंडल,माजी सरपंच संजित विश्वास,सरपंचा मिनती किर्तुनिया, ग्रामपंचायत सदस्य चंपा रतन मंडल, सुचित्रा फाडे तथा शिक्षक , विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.