
अर्जुनी मोर. ( सुरेंद्रकुमार ठवरे)- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता 13 आगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान “हर घर तिरंगा” या अभियानाने होत आहे. या अभियानाची सुरुवात भाजपाचे जेष्ठ नेते व माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री इंजी. राजकुमार बडोले यांचे हस्ते (ता.13) आपल्या निवासस्थानी सडक/ अर्जुनी येथून ध्वज फडकवून करण्यात आली. ध्वजारोहण कार्यक्रमाला राजकुमार बडोले, बाजार समितीच्या संचालीका शारदाताई बडोले, गोरेगाव पंचायत समितीचे सभापती मनोज बोपचे, उपसभापती राजकुमार यादव, माजी समाज कल्याण सभापती विश्वजीत डोंगरे ,राजहंस ढोके, प्रशांत शहारे सोनू भेंडारकर व अन्य मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
केंद्र शासनाचा हा राष्ट्रभिमान असलेला उपक्रम अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक घरी राबविण्यात यावा. यासाठी माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी संपूर्ण विधानसभा क्षेत्रात याचा प्रचार व प्रसार केला. जिल्हा परिषद निहाय सभा घेऊन या उपक्रमाची महती वाढावी म्हणून त्यांनी भरपूर मेहनत घेतली आहे . आपल्या मनात भारत देशाविषयी अभिमान दृढ व्हावा या उद्धांत हेतू असलेल्या उपक्रमात आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत मेरी मिट्टी मेरा देश उपक्रम प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर शिलाफलक उभारून वसुधा वंदन व पंचप्रण शपथ च्या माध्यमातून स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांना वंदन करणे .कलश व माती पूजन करून वृक्षारोपणाचे कार्यक्रम यशस्वीरित्या राबविण्याचे आवाहन माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी करून दिनांक 13 ऑगस्ट 15 ऑगस्ट या तीन दिवस हा उपक्रम ध्वज फडकवुन राबविण्याचे आवाहनही केले आहे.