
अर्जुनी मोरगाव,दि.१४-तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय कोहलगाव येथे मेरी माटी,मेरा देश या उपक्रमानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण क्रीडा व आरोग्य इंजि यशवंत गणविर होते.
या कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण करुन करण्यात आली.या कार्यक्रमाप्रसंगी देशाच्या सिमेवर लढणाऱ्या जवानांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना,आजचे युग हे स्पर्धेचे तंत्रज्ञानाचे युग आहे आणि या युगात आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल शिक्षण हे महत्त्वाचे साधन आहे.कारण शिक्षणामुळे मानवाचा सर्वांगीण विकास होतो.आज आपण इथे देशाच्या सिमेवर लढणाऱ्या जवानांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.यामुळे आज या पालकांचा सत्कार करताना माझा उर भरून आल्या सारखा वाटतो.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या महामानवांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.खर तर त्यांच्या बलिदानामुळे आज आपण सुखी समृद्ध बिनधास्त जीवन जगत आहोत.
पुढे बोलताना ते म्हणाले,आजही देशाच्या सिमेवर जीव मुठीत धरून भारतीय सैनिक दिवस रात्र शत्रुंशी लढत आहेत पण शोकांतिका आहे की आपल्या क्षेत्रातील तरुण,तरुणी सैन्यात भरती होण्यासाठी मागेपुढे पाहतात.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पं.स.उपसभापती होमराज पुस्तोडे, सरपंच बळीराम टेंभुर्णे, उपसरपंच हरीचंद घरत,माजी जि.प.सदस्य रतिराम राणे, गोठणगाव चे सरपंच संजय ईश्वार, ग्रामपंचायत सदस्य मंगला शेंदरे, निखिल कोडवते,लक्ष्मी चाचेरे,ममता दोनाडकर, यमुना मडावी, मुख्याध्यापक बी.बी.नाकाडे, सत्कारमुर्ती राजकुमार डोंगरवार,गुणीलाल ताराम,शाळा समितीचे राजकुमार मडावी, शबाना पठाण, प्रभावती डोंगरवार रविंद्र वाढई तथा गावकरी व शालेय विद्यार्थ्यी उपस्थित होते.