गोरेगाव नगरपंचायतीवर भाकपचे विविध मागण्यांना घेऊन आंदोलन

0
16

गोरेगाव,दि.14- भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने आज १४ आॅगस्ट २०२३ ला शहरातील नागरिकांच्या विविध समस्यांना घेऊन नगर पंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.भाकप नेते हौसलाल रहांगडाले,कल्पना डोंगरे,रामचंद्र पाटिल,गुणवंत नाईक,दुलीचद कावडे यांचा नेतृत्वात आयोजि धरणे आंदोलनात प्रकाश पंचभाई,रघुपती अगडे  यांनीही सहभागी होत नागरिकांना मार्गदर्शन केले.तसेच देवराव टेंभुर्णीकर,नेवल मारगाये,छाया धमगाये,गुलाब शहाहे आदी यावेळी मंचावर उपस्थित होते.

नगर पंचायत कार्यालयावर सातत्याने धरणे आंदोलन करुनही प्रशासन त्याकडे का लक्ष देत नाही असा मुद्दा उपस्थित करीत दिलेल्या निवेदनावरही नगरपंचायत प्रशासन कारवाई करीत नसल्याने नागरिकांच्या समस्या अधिक बिकट होत चालल्या आहेत.या सर्वाला राज्यातील तीनचाकी सरकार कारणीभूत असून राज्यसरकारचे नियंत्रण राहिले नसल्याचे रहागंडाले यांनी आपल्या भाषणात सांगितले.पुर्णवेळ नगरपरिषद सीओ नसल्याने अनेक कामे खोळबंली गेली असून जिल्हा प्रशासनाने तातडीने पुर्णवेळ सीईओ द्यावे अशी मागणी करण्यात आली.नगर पंचायत गोरेगांव द्वारे लाखों रुपये खर्च करून आरोग्याचा विचार करून शुध्द पाण्याचे फिल्टर आरओ लावण्यात आले,मात्र गेल्या 2 वर्षापासून ते बंद पडले आहेत,त्यांना तातडीने दुुरुस्त करण्यात यावे.थकीत घर टॅक्सवर व्याज आकारणी बंद करण्यात यावे.डीपीआर 3 ची यादी मंजूर करुण लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात यावे.२०१८ व २०१९ पासुन थकित ३० हजार रुपये देणयात यावे.मेन रोड स्टेट लाईट उद्घाटनानंतर बंद आहे ती दुरुस्त करण्यात यावे.सार्वजनिक सभागृह बांधण्यात यावे.तसेच जूना बसस्थानक परिसरात प्रवाशीशेडसह शौचालय मुत्रीघर बांधण्यात यावे आदि मांगण्याचे निवेदन नगर पंचायतच्या नावे देण्यात आले.