तिरोडा,दि.14ः तालुक्यातील ग्रामपंचायत वडेगाव येथे”स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” साजरा करण्याकरिता यावर्षी प्रधानमंत्री यांचे संकल्पनेतून साकार झालेला “मेरी माटी मेरा देश” हा कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमात देश सेवा करून परत आलेल्या गावातील सर्व माजी सैनिकांना आदराने आमंत्रित करण्यात आले होते.देशाकरिता आपले सर्वस्व अर्पण करून शहीद झालेल्या वीर सैनिकांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली व उपस्थित सर्व माजी सैनिकांच्या हस्ते शिलालेखचा अनावरण करण्यात आले.
ग्रामपंचायत सभागृहात सु.मे.बेनिराम टेम्भरे यांचे अध्यक्षतेखाली उपस्थित सर्व माजी सैनिक व त्यांच्या परिवाराचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.सदर कार्यक्रमात उपस्थित माजी सैनिकांनी व्यासपीठावरून आपापले मत मांडले. प्रामुख्याने प्रधानमंत्री यांच्या संकल्पनेतून साजरा करण्यात आलेला हा कार्यक्रम दरवर्षी साजरा करण्यात यावा.यानंतरच्या पाहिल्याच कार्यक्रमात आपल्या गावचे वीर पुत्र शहीद योगराज बिसेन यांचे स्मारक उभारून शाळेत एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात यावा असे प्रस्ताव मांडण्यात आले.सदर कार्यक्रम आयोजित करण्याकरिता, ग्रामपंचायत व गावातील सर्व माजी एकत्र येऊन ठोस नियोजन करू असे ठरविण्यात आले.सदर कार्यक्रम यशस्वी पारपाडण्याकरीता, सरपंच श्यामराव बिसेन सर्व मा. सदस्य, मा.सदस्या, सचिव ग्रामपंचायत वडेगाव तसेच माजी सैनिक मोरेशकुमार बिसेन,पवन बिसेन यांनी सहकार्य केले.