अर्जुुनी मोरगाव, ता.15:-येरंंडी दर्रे येथील जि. प. शाळेचे मुख्याध्यापक रामू फरदे यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनी अंगणवाडीला भारतीय लोकशाही संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र सप्रेमभेट देऊन त्यांना विनम्र अभिवादन केलं आणि स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. हा फोटो अंगणवाडी सेविका श्रीमती रेवता पंधरे यांनी सहर्ष स्वीकार केला.
दरम्यान ग्रामरोजगार सेवक संतोष जुनाके यांनी जि. प. शाळेला आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे छायाचित्र सप्रेम भेट दिले. परिणामी फुले आंबेडकरी विचार नेहमीच रुजत ठेवण्याची प्रेरणा मिळाली असे मनोगत गावकऱ्यांनी व्यक्त केलं.यावेळी सरपंच करणदास रक्षा, उपसरपंच ताराचंद भोगारे, ग्रामसेवक पृथ्वीराज कोल्हटकर आणि गावकरी उपस्थित होते.