
अर्जुनी मोर. ( सुरेंद्रकुमार ठवरे )- निसर्गाची मुक्तपणे उधळण असलेल्या अर्जुनी मोर. तालुक्यातील नवेगावबांध व ईटियाडोह जलाशयाचा स्वातंत्रदिनी 15,व 16 ऑगस्ट या सुट्टीच्या दिवसात हजारोंच्या संख्येने पर्यटकांनी निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटला.
अर्जुनी मोर. तालुक्याचे भुषण म्हणुन ओळखले जाणारे नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान,ईटियाडोह धरण ,प्रतापगड तिर्थक्षेत्र, तथा तिबेटीयन वसाहत हे स्थळ पावसाळ्यामधे अधिकच खुलून दिसतात.कृत्रिम सौंदर्य बनविण्यात लोकप्रतिनिधी व अधिकारी कमजोर पडले असले तरी निसर्गाने मात्र या स्थळांना भरभरुन सौंदर्य दिले आहे.त्यामुळे पर्यटकांचे पाय आपसुकच वळत असतात. संपुर्ण पहाडी व्याप्त ईटियाडोह व नवेगावबांध जलाशयातील पाणी तलावांचा विहंमगण नजारा ईतिहासाची साक्ष देतो.दोन्ही तलावाच्या कालव्यांनी झुळझुळ वाहणारे पाणी उंच उंच असणारे विविध प्रजातीचे हळुवार हलणारी पाणे हे दृष्य पर्यटकांना भुरळ घालते. नवेगावबांध तलावाच्या मध्यभागी असलेली मालडोंगरी पर्यटकांचे लक्ष वेधून घेते.चौपाटी , संजयकुटी मनोहर उद्यान पर्यटकांना आकर्षित करते.तसेच नवेगावबांध फाॅऊंडेशनने प्रचंड मेहनतीने तयार केलेला हिलटाॅप गार्डन सध्या पर्यटकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला असल्याची साक्ष देतो.उंचपहाडी सद्श्य असलेला हिलटाॅप गार्डन परिसर प्रवेशद्वारापासुनच आकर्षित करतो.आतील मनमोहक दृश्य बघुन पर्यटकांना फोटोशुट करण्याचा मोह आवारता येत नाही.पर्यटकांसाठी नास्ता व उत्तम जेवणासाठी सुनिल तरोणे यांनी उभारलेले ग्रीणपार्क उपहार गृह नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाच्या सौंदर्यात कमालीचा भर पाडतो. लहान बालकांसाठी ठिकठिकाणी तयार करण्यात आलेले बालोद्यानाचा बच्चेकंपनी मनमुराद आनंद लुटतात.उंच उंच सागवन,अशोकाची झाडे,बांबुची झाडे व विविध औषधीयुक्त नैसर्गिक वृक्ष सौंदर्याची साक्ष देतात.अशा या पर्यटनस्थळी 15 व 16 ऑगस्ट ला पर्यटकांनी हजोरोच्या संख्येनी हजेरी लावली.