
/सडक अर्जुनी::–स्वातंत्र्यदिनाच्या शुभ पर्वावर तालुक्यातील कोसमतोंडी ग्रामपंचायत ला ग्रामवासियांसाठी स्व. मारोती पा.काशिवार यांचे स्मृती प्रित्यर्थ इंजि. नरेंद्र काशिवार यांनी शवपेटी दान केली. ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण झाल्यानंतर शवपेटीचे लोकार्पण सोहळा पार पडला.शवपेटीचे लोकार्पण सरपंच महेंद्र पशिने , निशा गिरीधर काशिवार पं.स.सदस्या,इंजि.नरेद्र काशिवार ,उज्वला नरेंद्र काशिवार,राजु काशिवार ,टकाराम काशिवार ,ग्रामसेवक गोमाशे व ग्रामवासीयांचे उपस्थितीत करण्यात आले.इंजि.नरेद्र काशिवार व त्यांचे परिवाराने स्व. मारोती पा.काशिवार यांचे स्मृती प्रित्यर्थ शवपेटी दान केल्याने ग्रामवासीयांसाठी स्तुत्य असे कार्य केल्याने त्यांचे कौतुक व आभार मानले.शवपेटी दान केल्याने आता कोसमतोंडी ग्रामवासी व परिसरातील नागरिकांना बाहेरून शवपेटी आणण्याचा त्रास होणार नाही. ग्रामवासी व परिसरातील नागरिकांना सहज शवपेटी उपलब्ध होईल.