
… नगरपंचायत वतीने स्वातंत्र्यदिनी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन
अर्जुनी मोरगाव,-भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमाचे आम्ही सर्व साक्षिदार आहोत हे आमचे भाग्य आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभर “मेरी माटी मेरा देश” हा संकल्पनिय उपक्रम राबविला जात आहे.भारतीय स्वातंत्र्य संग्रामात ज्या भारत मातेच्या सुपुत्रांनी आपले सर्वोच्च बलिदान दिले त्या शूरविरांचे स्मरण होत रहावे यासाठी शिलाफलक उभारण्यात आले.घर घर तिरंगा,अमृत वाटिका या उपक्रमानी देश भक्तीला बहर आला.मातृभूमीच्या रक्षणासाठी,भारताच्या अखंडतेसाठी आम्ही सर्व एक ही भावना उरी बाळगु.शहरात विकासाची नवी चळवळ आपणास पहायला मिळणार आहे.अद्यावत सुसज्ज अशी अभ्यासिका,नगरपंचायतच्या सुसज्ज प्रशासकीय इमारतीचे पुनर्निरमान,स्मशानभूमी आणि गाव तलावाचे सौंदर्यकरण, सहरवासीयांना स्वच्छ पिण्याचे पाणी,उत्तम रस्ते,विद्युत व्यवस्था ,भूमिगत गटार योजना,भूमिगत विद्युत वाहिनी योजना आपल्या सेवेत प्रदान करू,नगराचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास असल्याचे प्रतिपादन नगरपंचायत अध्यक्ष मंजूषा बारसागडे यांनी केले.
त्या नगरपंचायतच्या वतीने स्थानिक वास्तल्य सभागृहात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमानिमित्य आयोजित गुणगौरव सोहळ्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होत्या.
यावेळी उपाध्यक्ष ललिता टेंभरे,सभापती यशकुमार शाहारे,सागर आरेकर,माजी सभापती दानेस साखरे,संजय पवार,अतुल बन्सोड,नगरसेविका ममता भैया, शीला उईके,सपना उपवंशी,इंदू लांजेवार,सुषमा दामले उपस्थित होते.
यावेळी नगरसेवक राधेश्याम भेंडारकर यांनी शहरवासीयांनी आमच्या सारख्या नवख्यांवर विश्वास ठेवून नगरविकासाची जबाबदारी जनतेने दिली. नागरिकांच्या सेवेसोबत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू.जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नसल्याचे स्पष्ट केले.
या उपक्रमा निमित्ताने भारत माता चौकात शिलाफलक अनावरण,स्मशानभुमीत अमृत वाटिका अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात भारत माता,राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमापूजनाने झाली.आयोजित गुणगौरव सोहळ्यात अमृत महोत्सच्या समारोपीय उपक्रमाअंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.यात शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,हायस्कूल सरस्वती विद्यालय,न्यूमून इंग्लिश मिडीयम स्कुल आणि बहुउद्देशीय हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत प्राविण्य प्राप्त केले त्यांचा सत्कार करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण खुशबू प्रल्हाद बरय्या हीचा सत्कार करण्यात आला.अंगणवाडी सेविका,आशा सेविका यांचाही सत्कार झाला.या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर विविध कार्यक्रम सादर केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रशासकीय अधिकारी अमोल जाधव,सुमित मेश्राम तर आभार प्रभारी मुख्याधिकारी प्रणय तांबे यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी नगरपंचायतचे स्वाती तायडे,सुशांत आरु, प्रफुल्ल गाडबेल,दीपक राऊत आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.