पोस्को प्ररणात आरोपीची निर्दोष सुटका

0
30

गोंदिया, दि.21 : प्रमुख जिल्हा व विशेष सत्र न्यायालय, गोंदिया यांनी बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) या प्रकरणातील आरोपी बल्ला ऊर्फ चंभारु नागपुरे, वय २३ वर्ष याची १४ ऑगस्ट २०२३ रोजी निर्दोश सुटका केली. प्रकरण असे आहे की, दिनांक २४ मार्च २०१७ ला पोलीस स्टेशन सालेकसा अंतर्गत मौजा खडखडीटोला पो. पाऊळदौना ता. सालेकसा जि. गोंदिया येथे रहिवासी असुन पिडीतानी पोलीस स्टेशन सालेकसा येथे रिपोर्ट दाखल केली होती की, दिनांक २१ मार्च २०१७ ला पिडीता सकाळी ९.३० वाजता सालेकसा येथे भारतीय स्टेट बँक येथे पैसे काढण्यासाठी गेली होती. परंतु सदर बँक ही बंद असल्याने सालेकसा येथे चौकात आली, तेव्हा तीची मैत्रिण तिला मिळाली तिच्या सोबत ती ५ ते १० मिनिट बसली होती. त्याच वेळेस तिच्या गावात राहणारा आरोपी बल्ला ऊर्फ चंभारु नागपुरे, वय २३ वर्ष तेथे आला. त्याला पाहुन पिडीत ही तिथुन निघुन गेली.

        नंतर आपल्या गावी येण्यासाठी मुरूमटोला रोडनी येत असतांना दुपारी १ वाजता आरोपी आपल्या मोटारसायकलनी पाठीमागून आला व पिडीताच्या सायकलसमोर आपली मोटारसायकल त्याने अडवली आणि त्याने पिडीतास असे म्हटले की, तू माझे सोबत का बोलत नाहीस ? त्याच वेळेस पिडीताची ओढणी ओढुन तिचा हात पकडला. तेव्हा पिडीताने त्याला असे म्हटले की, मी माझ्या आई-वडीलांन तुझे नांव सांगीन असे बोलताच आरोपी तेथून पळून गेला.

       त्यांचे तोंडी रिपोर्ट नुसार पोलीस स्टेशन सालेकसा यांनी ३५४, ३५४ अ, ड भादवी आणि सह कलम ७, ८, ११, १२ पोक्सो प्रमाणे गुन्हा नोंद करून गोंदिया न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यानंतर न्यायालयात पिडीतातर्फे साक्षदारांचे बयान नोंदविण्यात आले. त्यावर सरकारी वकील व आरोपीचे वकील अ‍ॅड. शबाना अंसारी यांचे युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश यांनी आरोपीला निर्दोष बरी केले. आरोपीतर्फे अ‍ॅड. शबाना अंसारी, मुख्य कायदेशीर मदत संरक्षण सल्लागार बचाव प्रणाली, गोंदिया म्हणून आपले पक्ष मांडले होते.