
गोंदिया,दि.21– भंडारा-गोंदिया जिल्हा परिषद व शासकीय कर्मचारी पतसंस्थेच्या 20 आँगस्ट रोजी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज 21 आँगस्टला भंडारा येथे पार पडली.या निवडणुकीत सहकार पॅनलचा दारुण पराभव झाला असून परिवर्तन पॅनलने सर्वाधिक 17 जागा जिंकल्या आहेत.गोंदिया जिल्हा परिषद मुख्यालय गटातूनही परिवर्तनचे अनमोल मेेश्राम यांनी सहकारचे संतोष तोमर यांचा 50 मतांनी पराभव केला. निवडणुकीत परिवर्तन – 17
सहकार – 02 व स्वाभिमान पॅनलने 01 जागा जिंकली आहे.परिवर्तन पॅनलच्या कपबसी निवडणुक चिन्हावर तुमसर – दिनेश घोडीचोर,मोहाडी – कोमल चव्हाण,पवनी – पांडूरंग नखाते,साकोली – अनिल खंडाईत,लाखांदूर – सुरेश वैद्य,अर्जुनी सडक/मोर.- विजय डोये,गोरेगाव/आमगाव – शंकर चव्हाण,गोंदिया zp – अनमोल मेश्राम, सालेकसा/देवरी – विनोद चौधरी,गोंदिया – चंद्रशेखर दमाहे,तिरोडा कन्हैयालाल रहांगडाले, विमाभविजा – कैलाश हांडगे,सर्वसाधारण – संजीव बावनकर,इमाव – प्रकाश ब्राह्मणकर,अजा – मनिष वाहने, महिला – स्नेहल पडोळे व शालु सावरकर तर सहकार पॅनलच्या लाखनी – रसेष फटे, भंडारा – सुरेश कोरे व स्वाभीमान पॅनलने भंडारा जिल्हा परिषद मुख्यालयाची जागा जिंकली.