Home विदर्भ पोवार समाजभवन बांधकामासाठी खा.पटोलेंनी दिले ४० लाख

पोवार समाजभवन बांधकामासाठी खा.पटोलेंनी दिले ४० लाख

0

गोंदिया-भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांनी आपल्या खासदार निधीतून पोवार प्रगतीशील मंचच्यावतीने चालविण्यात येणाèया चुटीया येथील शाळेच्या आवारqभत बांधकामासाठी १५ लाख रुपये तर कन्हारटोलीस्थित पोवारसमाज सांस्कृतीक भवनाच्या सौंदर्यीकरणासाठी २५ लाख असा ४० लाख रुपयाचा निधी मंजुर केला.९ मे रोजी त्यांनी पोवार समाज बांधवाच्या उपस्थितीत संघटनेचे अध्यक्ष डॉ.कैलास हरिणखेडे यांच्याघरी झालेल्या बैठकीत याबद्दलची घोषणा करुन पत्र दिले.यावेळी डॉ.धनपाल टेंभरे,भालचंद्र ठाकुर,संजय रहागंडाले,पकंज रहागंडाले तसेच समाजबांधव उपस्थित होते.याचवेळी त्यांनी प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्वविद्यालयाच्या कार्यालयात जाऊन तेथील विकास कामासाठी सुध्दा त्यांनी १५ लाख रुपयाचा निधी दिला.

Exit mobile version