
तिरोडाः- उपजिल्हा रुग्णालयात कर्मचाऱ्यांच्या अव्यवस्थेमुळे वैद्यकीय सेवेच्या अभावामुळे जनतेने त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे तालुक्यातील गरीब व गरजवंत जनतेला अतोनात त्रास सहन करावा लागतो. या संबंधात निवेदन माजी नगर परिषद उपाध्यक्ष इंजि.देवेंद्र तिवारी यांनी वैद्यकीय अधिक्षकांना भेट देऊन विविध समस्या त्वरित पूर्ण करण्याच्या दिशेने पावले उचलावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे,
उपजिल्हा रुग्णालयात एनेथेसिया डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे सीजरिंग प्रसुती आठवड्यातून फक्त एकच दिवस केली जाते.त्यामुळे उर्वरित दिवशी प्रसुस्तीला आलेल्या पेशंटला गोंदिया किंवा नागपूर या ठिकाणी रेफर केले जाते.हे ग्रामीण विभागातील जनतेंना फार त्रासाचं ठरत आहे. दिवसभर दवाखान्यात भरती ठेवून सायंकाळी त्यांना ट्रान्सफर केल्यामुळे अनेक सुविधामुळे व आथिर्क समस्यांमुळे पेशंटची खूपच हाल होत आहे.जिल्हा उप रुग्णालयात सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध आहे,परंतु नियमीत रेडिओलॉजी नसल्यामुळे खाजगी रेडिओलॉजीच्या मर्जीमुळे गरोदर स्त्रियांना रात्रीच्या दोन दोन वाजेपर्यंत थांबवावे लागते. त्यामुळे ग्रामीण भागात राहत असलेल्या जनतेला जाण्या येण्यासाठी खूपच त्रास होत आहे,त्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी त्वरित पाठपुरावा करून प्रशासनाने रेडिओलॉजी ची जागा भरावी व जनतेला असुविधापासुन थांबविण्यासाठी प्रयत्न करावे. या प्रकारची मागणी निवेदनामधून माजी नगर परिषद उपाध्यक्ष इंजि.देवेंद्र तिवारी यांनी वैद्यकीय अधीक्षक श्री भगत यांच्याशी भेट घेऊन निवेदनातून निदर्शनात आणून दिली. प्रशासनाने योग्य ती कारवाई त्वरित केली नाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा माजी नगर परिषद उपाध्यक्ष देवेंद्र तिवारी यांनी दिला आहे.यावेळी सामाजिक कार्यकर्ते भवानीसिंह बैस, राजेश गोटेफोडे, विजय खोब्रागडे,तिर्थराज नागरिकर, अजय डडुरे, शुभम गुप्ता, आधी मान्यवर उपस्थित होते.