Home विदर्भ महिला पोलिसांचे सामान्य ज्ञान कमीच; पोलीस आयुक्तांचे वक्तव्य

महिला पोलिसांचे सामान्य ज्ञान कमीच; पोलीस आयुक्तांचे वक्तव्य

0

नागपूर, दि. १८ – जनसामान्यांना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी पुरुषांसोबत महिला पोलीसदेखील खांद्याला खांदा लावून काम करत असतात. परंतु पोलीस अधिकारी मात्र महिलांना दुय्यमच समजत असल्याचे नागपूरात दिसून आले. खुद्द पोलीस आयुक्त एस.पी.यादव यांनी महिला पोलिसांना सामान्य ज्ञान कमी असल्याची मुक्ताफळे उधळली आहेत. सामान्य ज्ञान कमी असल्यानेच महिला पोलिसांची लेखी परिक्षेदरम्यान ड्युटी लावण्यात आली होती. या प्रकाराने आम्ही आमच्या रणनितीत यशस्वी झालो, या त्यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

Exit mobile version