जिल्हाधिकाऱ्यांचे हस्ते कायदेशिर पालकत्व प्रमाणपत्र वाटप

0
64

गोंदिया, दि.28 : राष्ट्रीय विश्वस्त कायदा 1999 अंतर्गत वय 18 चे वर Autism, Cerebral, Mental Retardation and Multiple Disability हे दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांगांचे कायदेशिर पालकत्व देण्याची योजना जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येते. त्याअनुषंगाने राष्ट्रीय विश्वस्त कायदा 1999 नुसार गठीत स्थानिक स्तर समिती, जिल्हा व्यवस्थापन समिती तसेच जिल्हास्तरीय दिव्यांग कल्याण समिती अंतर्गत जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांचे अध्यक्षतेखाली 26 सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले होते.

         एप्रिल-2023 च्या स्थानिक स्तर समिती सभेमध्ये मंजुर झालेल्या कायदेशिर पालकत्व 15 प्रस्तावांचे प्रमाणपत्र ऑनलाईन पध्दतीने देण्यात आलेले आहे. जिल्ह्यात ऑनलाईन कायदेशिर पालकत्व प्रमाणपत्र वितरीत करण्यात येत असल्याने मंजुर प्रस्तावांपैकी 03 पालकांना त्यांच्या दिव्यांग पाल्ल्यांसह सदर समिती सभेमध्ये आमंत्रित करण्यात आले होते.

         यावेळी जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांचे हस्ते 03 पालकांना त्यांचे दिव्यांगत्व असलेल्या पाल्ल्यांचे कायदेशिर पालकत्व प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. यामध्ये 1) साक्षी विजय श्रावणकर, दिव्यांग व्यक्ती यांचे पालकत्व विजय गोविंदा श्रावणकर (वडील), मीना विजय श्रावणकर (आई). 2) मेहुल राजेशभाई चंदाराणा, दिव्यांग व्यक्ती यांचे पालकत्व राजेशभाई ब्रजलाल चंदाराणा (वडील), ज्योती राजेशभाई चंदाराणा (आई). 3) निधी सागर लोहीत, दिव्यांग व्यक्ती यांचे पालकत्व सागर राजेंद्र लोहीत (वडील), भाग्यश्री सागर लोहीत (आई) यांचा समावेश आहे.

         कायदेशिर पालकत्व प्रमाणपत्र वितरीत करतेवेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी दि.ब्रि.हरिणखेडे, सहाय्यक सल्लागार वैशाली तायडे, दिव्यांग कल्याणकारी संघटना गोंदिया अध्यक्ष दिगंबर बंसोड, कोषाध्यक्ष आकाश मेश्राम, समिती सदस्य शोभेलाल भोंगाडे, कोमल बारेवार उपस्थित होते.

          राष्ट्रीय विश्वस्त कायदा 1999 अंतर्गत वय 18 वर्षावरील Autism, Cerebral, Mental Retardation and Multiple Disability हे दिव्यांगत्व असलेल्या जास्तीत पालकांनी कायदेशिर पालकत्व या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी दि.ब्रि.हरिणखेडे यांनी केले आहे.