गुलाब बिसेन यांचा फिपोली बालकवितासंग्रह प्रकाशित

0
15

तिरोडा –तालुक्यातील सितेपार येथील लेखक गुलाब बिसेन यांच्या “फिपोली” या प्रातिनिधिक पोवारी बालकविता संग्रहाचे प्रकाशन आनंदवन येथे करण्यात आले.

मराठी तसेच पोवारी बोलीचे बालसाहित्यिक गुलाब बिसेन यांनी संपादित केलेल्या पोवारी बोलीतील “फिपोली” या प्रातिनिधीक बालकविता संग्रहाचे प्रकाशन कवी रमेश बोपचे यांच्याहस्ते आनंदवन येथे करण्यात आले. या कविता संग्रहामध्ये पोवारी बोलीतील पंधरा कवींच्या निवडक पंचेचाळीस बालकवितांचा समावेश आहे. पोवारी बोली साहित्यातील हा अशाप्रकारचा पहिलाच बालकविता संग्रह आहे. या बालकविता संग्रहाची पाठराखण ऋषी बिसेन (IRS) संयुक्त आयुक्त (TDS) आयकर विभाग, नागपूर यांनी केली असून इंजि. गोवर्धन बिसेन यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे. यावेळी कवी रमेश बोपचे, मायाबाई ठाकरे, महेंद्र रहांगडाले, गुलाब बिसेन, उपस्थित होते.