ऑनलाईन सि.आर.एस. पोर्टलवरवरुन दाखले सुलभ मिळण्याची कार्यप्रणाली कार्यान्वीत
- श्री.विजय अहिरे , सहसंचालक, जनगणना कार्यालय, मुंबई
गोंदिया- 30 व 31 ऑक्टोंबर रोजी जिल्ह्यातील पंचायत समिती व ग्रामपंचायती यांना भेटी देवुन नागरी नोंदणी पद्धती, जन्म व मृत्यू नोंदणी बाबत होत असलेल्या कामकाजाची पाहणी जनगणना कार्यालय मुंबई सहसंचालक विजय अहिरे यांनी केली. तत्पुर्वी सहसंचालक यांनी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) गोंविद खामकर ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे व जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल यांची भेट घेऊन जिल्ह्यात नागरी नोंदणी पद्धती व कार्यप्रणाली बाबत चर्चा केली.
जन्म व मृत्यु सारख्या महत्वाच्या घटनाच्या नोंदणी ऑनलाईन crsorgi.gov.in या पोर्टल वर करुन लाभार्थ्यांना ऑनलाईन दाखले देणे बंधनकारक असल्याच्या सुचना दिल्या.नागरी नोंदणी अधिनियम 1969 नुसार कार्यवाही करणे बंधनकारक असल्याचे सांगितले. ज्या आरोग्य संस्था जसे जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे बालकांचा जन्म होतो त्याच ठिकाणी तेथील वैद्यकिय अधिकारी यांना स्वतंत्र लॉगिन प्रणाली देण्यात येवुन लोकांना जन्म व मृत्यु घटना झालेल्या ठिकाणी जन्म/मृत्युचे दाखले देण्याबाबत कार्यप्रणाली विकसित झाली आहे. तसेच घरी, रस्त्यात किंवा आरोग्य उपकेंद्रात झालेल्या घटने दरम्यान कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायती, नगरपरिषद, नगरपंचायती यांनी घटनेची ऑनलाईन नोंदणी करुन त्या घटनेचे प्रमाणपत्र देण्यात यावे.
सहसंचालक यांनी गोंदिया तालुक्यातील फुलचुरटोला व अदासी ग्रामपंचायती, गोंदिया पंचायत समिती कार्यालय तसेच आमगाव तालुक्यातील अंजोरा व बोरकन्हार ग्रामपंचायती, पंचायत समिती कार्यालय येथे भेट देऊन पोर्टलवर जन्म/मृत्यू नोंदणी करण्यात येते किंवा नाही याची पाहणी केली. भेटीदरम्यान संबधीत प्रमुखांना नागरी नोंदणी पद्धती बाबत मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन लोकांना सुलभतेने दाखले देण्याच्या सुचना दिल्या .
भेटी दरम्यान त्यांचे समवेत जिल्हा परिषदेचे जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल, वरिष्ठ ग्रेड-1 अधिकारी पि.एल- जिमणेकर ,आरोग्य पर्यवेक्षक विजय शेंडे, आरोग्य विस्तार अधिकारी मिलिंद नंदागवळी उपस्थित होते.