देवेंद्र रामटेके
गोंदिया(ता.22) गोंदिया तालुक्यातल चुलोद येथे जनसुविधा योजने अंतर्गत प्रस्तावित सिमेंटरस्ता बांधकामाचे भूमिपूजन बुधवारी (ता. 22 ) सरपंच मायाबाई बोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच लतीश बिसेन, ग्रामपंचायत सदस्य विजय ठाकूर, महेश बाणेवार, संजय बिसेन,पुरुषोत्तम बागडे, दामेश्वरी भगत, शकुंतला ठाकूर, सिंधुबाई चुटे, मंगला मेश्राम, सीताबाई पाडोळे, गीताबाई बरईकर, ग्रामविकास अधिकारी एच.पी. लेंडे प्रामुख्याने उपस्थित होते. सदर रस्त्यावर अंदाजित पाच लक्ष रुपये खर्च अपक्षित असून तो दुळीचंदबानेवार ते होलिराम मौजे यांच्या घरापर्यंत बांधण्यात येणार आहे. मागच्या अनेक वर्षांपासून सदर रस्त्याची मागणी गावकऱ्यांनी लावून धरली होती. अखेर सरपंच महोदयांनी पुढाकार घेत तो रस्ता मंजूर करवुन घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोजगार सेवक नानाजी मेश्राम, परिचर रामप्रसाद कटरे, योगेश ठाकूर,सुरेश चौधरी यांनी सहकार्य केले.