देवरी तालुक्यातील अतिदुर्गम गावांमध्ये क्षयरोग व कुष्ठरोग मोहिम प्रभावीपणे राबविणार-डॉ. ललित कुकडे

0
13

दि.२० नोव्हेंबर ते ०६ डिसेंबर २०२३ या कालावधीत कुष्ठरुग्ण व सक्रीय क्षयरोग शोध मोहीम

गोंदिया (दि.25 नोव्हेंबर) : केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दि. २० नोव्हेंबर ते ०६ डिसेंबर २०२३ या कालावधीत देवरी तालुक्यातील अतिदुर्गम गावोगावी कुष्ठरुग्ण शोध अभियान व सक्रीय क्षयरोग शोध मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती देवरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.ललित कुकडे यांनी दिली आहे.मोहिमे दरम्यान तालुक्यातील आशा सेविका ,प्रशिक्षीत स्वंयसेवक घरोघरी सर्वेक्षण करून संशयित कुष्ठरुग्ण व क्षयरोग रुग्ण शोधत आहे.या मोहिमेकरता दोन सदस्यांची एक पथक राहणार आहे. या पथकामध्ये आशा सेविका व पुरुष स्वयंसेवक असणारा आहे. हे पथक कुटुंबातील व्यक्तींची तपासणी करणार असून रोगाची लक्षणे आहेत किंवा नाही या बाबत तपासणी करून आरोग्य संस्थेत संदर्भसेवा देण्यात येणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र येथे वैद्यकिय अधिकारी व उपकेंद्रात सामुदायिक आरोग्य अधिकारी तपासणी करुन औषधोपचार सुरू केला जाणार आहे करणार आहे. त्यामुळे घरी येणाऱ्या पथकाकडुन तपासणी करण्याचे आवाहन डॉ. ललित कुकडे यांनी केले आहे.
शोध अभियाना दरम्यान नागरिकांनी क्षयरोग व कुष्ठरुग्ण या आजाराबाबत गैरसमज व भिती न ठेवता आपल्याला होणारा त्रास न लपवता घरी येणार्या पथकाला सहकार्य करावे. सामाजिक कारणाने कुष्ठरोग लपवण्याकडे लोकांचा विशेषतः महिला भगिनीचा कल असतो. योग्य उपचाराने दोन्ही आजारावर प्रतिबंध करता येवु शकतो. घरातील सर्व सदस्यांची कुष्ठरोग व क्षयरोग संदर्भात संपुर्ण शारिरीक तपासणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी ह्यावेळी म्हटले आहे.
कुष्ठरुग्ण व क्षयरोग हे दोन्ही आजार संपुर्ण उपचाराने बरा होवू शकतो. म्हणुन लोकांनी प्राथमिक स्तरावर जाणवणारे लक्षणे आरोग्य पथकास सांगावे. लवकर निदान ,तत्पर उपचार केल्यास क्षयरोग व कुष्ठरुग्ण नक्कीच हमखास बरा होवु शकतो. दोन्ही आजारावरील औषधी सर्व सरकारी रुग्णालयात मोफत उपलब्ध असल्याचे डॉ. ललित कुकडे यांनी म्हटले आहे.
मोहिमेच्या पहिल्याच दिवशी देवरी तालुक्यातील अतिदुर्गम उपकेंद्र शिंगणडोह व सुकळी गावात काही घरांना भेटी देवुन शोध मोहिम राबविण्यात आली. त्या वेळी आशा सेविका ललिताबाई मिरी व स्वंयसेवक मयुर अमरसिंग शेंदुर. त्यांनी गावात भेट देवुन क्षयरोग व कुष्ठरुग्ण लक्षणे असलेल्या लोंकाना पोस्टर व लिफलेटच्या माध्यमातून जनजागृती केली. गावातील लोकांशी हितगुज करून मोहिमेबाबत जनजागृती केली.
२० नोव्हेंबर ते ०६ डिसेंबर २०२३ या कालावधीत होणाऱ्या संयुक्त कुष्ठरोग व सक्रीय क्षयरोग शोध मोहीमेसाठी देवरी तालुक्यातील अतिदुर्गम गावोगावी भेटिचे नियोजन करण्यात आले असुन महात्मा गांधीजीचे निरोगी गाव स्वप्न पुर्ण करण्यासाठी तालुका आरोग्य प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी म्हटले आहे.