गोंदिया-जिल्हा परिषद गोंदियाच्या वतीने नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती व लाभ देण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक तालुक्यातील दोन गावात “ जिल्हा परिषद आपल्या गावी “ महत्वकांक्षी उपक्रम जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडाले, उपाध्यक्ष ईजि. यशवंत गणवीर व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील उपक्रमाच्या माध्यमातून शिबिरे आयोजित करण्याचा नाविण्यपुर्ण संकल्प करण्यात आला. “ जिल्हा परिषद आपल्या गावी “ अभियानाचा शुभारंभ सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा येथे 30 नोव्हेंबर रोजी करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील प्रशासकिय अधिकारी,पदाधिकारी ,विभाग प्रमुख,जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणार्या विविध योजना, उपक्रम, कार्यक्रमाची जनजागृती गाव पातळीवर करण्यात आली.
“ जिल्हा परिषद आपल्या गावी “ अभियानात आरोग्य विभाग अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र डव्वा येथील चमूने जनजागृती स्टॉल लावून आरोग्य विभागाअंतर्गत विविध लोकाभूमिक योजनांची माहिती जशी जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृ वंदन योजना, जननी शिशु सुरक्षा योजना ,मानव विकास कार्यक्रम, नवसंजीवनी मातृत्व अनुदान योजना इ.बाबत माहिती देण्यात आली तसेच राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत विविध आजारांवरील प्रतिबंधात्मक उपाययोजनाची माहिती बॅनरच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्र डव्वा कडुन आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात लोकांच्या आवश्यक प्रयोगशाळा तपासणी करण्यात आल्या.
“ जिल्हा परिषद आपल्या गावी “ अभियानात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे, तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र डव्वाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. स्नेहा बनकर ,मानसेवी वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद भुते, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी घनश्याम बावनकर, औषध निर्माण अधिकारी धनंजय ठाकुर,आरोग्य सहाय्यक विलास आरिकर, आरोग्य सहायिका नागदेवे, आरोग्य सेवक संदिप कांवळे,सचिन चौधरी,उमेश बांगडकर, पी.के. सोनपिंपळे,हरिष दोनोडे, सिद्धार्थ गेडाम, आरोग्य सेविका बोदरे, खोब्रागडे,करपते, गेडाम ,तर आशा सेविका गट प्रवर्तक बिंदु शेंडे, व सर्व आशा सेविका यांनी सहभाग घेतला.