गोंदिया, दि.5 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, गोंदिया येथे जागतिक एड्स दिनानिमीत्त सहयोग हॉस्पीटल गोंदिया यांचे सहयोगाने एक दिवसीय आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन 1 डिसेंबर 2023 रोजी करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. टी. वानखेडे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून ए. एम. खान जिल्हा न्यायाधीश-1, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सकलेश पिंपळे, सहयोग हॉस्पीटलचे कॉर्पोरेट मॅनेजर विरेंद्रसिंह ठाकुर व जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष सी. के. बडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीख ए. टी. वानखेडे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यानंतर कार्यक्रमात आरोग्य तपासणी करण्याकरीता आलेले सर्व डॉक्टर्स व सहयोगी स्टाफचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी सहयोग हॉस्पीटल गोंदिया यांच्या सहयोगाने जिल्हा न्यायालय गोंदिया येथील न्यायीक अधिकारी, कर्मचारी वृंद, वकील वर्ग यांच्याकरीता एक दिवशीय आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये ई.सी.जी., शुगर तपासणी, बी.पी. तपासणी, डोळे तपासणी, प्रजनन संबंधीत चाचणी, सामान्य तपासणी व इतर आरोग्य संबंधीत चाचणी घेण्यात येवून जवळपास 300 लोकांनी सदर आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरीता जिल्हा विधी सेवा प्राधिकारी गोंदिया येथील कर्मचारी अधीक्षक पी. बी. अनकर, कनिष्ठ लिपीक ए. एम. गजापुरे, एस. एम. कठाणे, एस. डी. गेडाम, के. एस. चौरे, पी. एन. गजभिये, एल. ए. दर्वे तसेच शिपाई बी. डब्ल्यू. पारधी, आर. ए. मेंढे यांनी मोलाचे सहकार्य केले.