रोजगार हमी योजनेचे जानेवारीपूर्वी नियोजन करा – आ.विजय रहांगडाले

0
20

तिरोडा:- महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्याककरिता वरदान ठरत असून या अंतर्गत ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती होत असते तालुका पातळीवर पंचायत समितीस्तरावर याचे नियोजन होत असून या नियोजन व कामांचा आढावा घेण्याकरिता तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या अध्यक्षतेखाली आज पंचायत समिती सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली यामध्ये तालुक्यातील सरपंच व सचिव हजर असून गावपातळीवर जास्तीत जास्त रोजगार निर्मिती होवून नागरिकांना काम मिळेल असे नियोजन करण्याबाबत आमदार महोदयांनी निर्देश दिले सदर नियोजन १० जानेवारीपर्यंत पूर्ण करून वरिष्ठ कार्यालयात सादर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या या बैठकीमध्ये प्रामुख्याने प. स. सभापती कुंता पटले, उपसभापती हुपराज जमाईवार ,जि. प.सदस्य चत्रभुज बिसेन, पवन पटले, जगदीश बावणथडे,किरण पारधी तुमेश्वरी बघेले, एड.माधुरी रहांगडाले, रजनी कुंभरे, प. स. सदस्य चेतलाल भगत, सौ. ज्योती टेम्भेकर, प्रमिला भलाई, ज्योती शरणागत, सुनंदा पटले, कविता सोनेवाने,गटविकास अधिकारी सतीश लिल्हारे,सरपंच संघटनेचे अध्यक्ष विनोद लिल्हारे व तिरोडा तालुक्यातील सरपंच,सचिव उपस्थित होते.