शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्येक गरजवंतांना मिळावा:- लायकराम भेंडारकर

0
16

अर्जुनी मोर.– गावातील शेवटच्या घटकातील सर्वसामान्य जनता केंद्र व राज्य शासनाच्या लोकाभिमुख योजना पासून वंचित राहू नये. प्रत्येक गरजू लाभांवीत होऊन विकास प्रक्रियेत सहभागी व्हावा. असा ध्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंगीकारुण विकसित भारताचा संकल्प केला आहे. गावातील गरजवंताला शासकीय योजनाचा लाभ मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधीसह स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रयत्न करावे. शेवटच्या स्तरावरील सर्वसामान्य माणूस वंचित राहू नये. विविध लोकोपयोगी योजनांची माहिती करून देण्यासाठी संबंधितांनी पुढे यावे .संकल्प यात्रेच्या माध्यमातून सामान्यांना लाभ मिळावा असे प्रतिपादन गोंदिया जिल्हा परिषद चे गटनेते,तथा जिल्हा परिषद सदस्य लायकराम भेंडारकर यांनी केले.
विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान तालुक्यातील बोंडगाव देवी येथील बाजार चौकात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सरपंच प्रतिमा बोरकर, ग्रामपंचायत सदस्य डॉ.शामकांत नेवारे, अमरचंद ठवरे, माया मेश्राम, सरिता नेवारे ,डॉ. कुंदन कुलसुंगे, ग्रामविकास अधिकारी धर्मराज लंजे, प्रकाश खोटेले, मानापुरे मॅडम, प्राचार्य गोपीकिसन भोयर, विनोद चिचमलकर, उपस्थित होते .सर्वप्रथम विकसित भारत संकल्प यात्रा रथ घेऊन येणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांचे ग्रामपंचायतीकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारतासाठी अंमलात आणलेल्या विविध योजनांची चित्रफीत दाखविण्यात आली. यावेळी आभा आयुष्यमान भारत कार्डचे लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनांची माहिती ग्रामविकास अधिकारी धर्मराज लंजे यांनी दिली, आरोग्य विभागाच्या योजना डॉ. कुंदन कुलसुंगे तर कृषी विभागाची माहिती प्रमोद खोटेले यांनी दिली. ग्रामविकास अधिकारी धर्मराज लंजे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तसेच उपस्थितांचे आभार मानले.