आ.कोरोटेकडून मृतक उईकेच्या कुटुंबाला मदत

0
15

 ■ २ डिसेंबर रोजी जागेश्वर उईके ह्या गुपचूप वाल्याचा क्रेनच्या धडकेने झाला मृत्यू.

सालेकसा,ता.०६:२ डिसेंबर २०२३ रोजी सालेकसा आमगाव राज्य महामार्गावर झालेल्या अपघातात गुपचूप विक्रेत्याचा जागीच मृत्यू झाला. कुणबीटोला येथील ३३ वर्षीय तरुण जागेश्वर विठोबा उईके हा दररोज प्रमाणे कुणबीटोला येथून आपल्या गावी गुपचूप विकण्यासाठी जात असताना मागून येणाऱ्या क्रेनने गुपचूप विक्रेत्याला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की गुपचूप विक्रेत्याचा ,जागीच मृत्यू झाला. दरम्यान, मृत्यूचे वृत्त समजताच कुटुंबीयांनी आमगाव सालेकसा रस्त्यावर रास्ता रोको करून मृत जागेश्वर उईके यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची मागणी केली होती. आज बुधवार ( ता.६ डिसेंबर २०२३) रोजी आमगाव देवरी विधानसभा मतदार संघाचे आमदार सहषराम कोरोटे यांनी उईके कुटुंबीयांची भेट घेतली आणि आर्थिक मदत केली. यावेळी सोनपूरीचे सरपंचअरुण माच्छिरके, उपसरपंच उमेश चुटे, जागेश्वर मच्छीरके, विसम लील्हारे ,जागेश्वर नागपुरे, सालेकसा पं.स.चे गटनेता जितेंद्र बल्हारे, अनुप चुटे, गौरव चुटे,भागचंद लिल्हारे, राकेश चुटे, धर्मराज चुटे, मूलचंद मच्छीरके यांच्यासह परिसरातील नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते.