मामा तलाव दुरुस्ती कामाचे भूमिपूजन

0
14

अर्जुनी मोर-तालुक्यातील बाकटी येथील गट क्रमांक 43 मधील मामा तलाव दुरुस्ती कामाचे भूमिपूजन या विभागाच्या जिल्हा परिषद सदस्या रचनाताई गहाणे यांचे हस्ते ( ता.7 )करण्यात आले.
यावेळी पंचायत समिती सदस्या पुष्षलताबाई दृगकर, सरपंच सरिता राजगीरे, उपसरपंच गुलशन सांगोळे, ग्रामपंचायत सदस्य नरेश दिघोरे, वैशाली सांगोळे, शालु मेश्राम, ल.पा.जलसंधारण अधिकारी मायकल पुंडकर,रोजगार सेवक अजय सांगोळे व शेतकरी बंधु प्रामुख्याने उपस्थित होते .
या तलाव दुरुस्ती कामामुळे तलाव मजबूत होवुन तलावातील जलसाठ्याची क्षमता वाढुन याचा फायदा शेकडो शेतकरी यांना सिंचनासाठी फायदेशीर ठरेल असा विश्वास जिल्हा परिषद सदस्या रचनाताई गहाणे यांनी व्यक्त केला.