अतिरिक्त मालमत्ता कर आकारणी मागे घ्या-राष्ट्रवादीचे नगराध्यक्षाना निवेदन

0
21

अर्जुनी मोरगाव,-नगरपंचायतने आर्थिक वर्ष 2023-24 ते 26-27 करीता चतुर्थ वार्षिक मालमत्ता कर आकारणी प्रस्तावित केली आहे.नवीन कर आकारणी धोरनाचे कर मागणी पत्र नागरिकांना प्राप्त झाले.या मागणीपत्रातील अवाढव्य मालमत्ता कर आकारणी पाहून नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला.सदर करआकारणी दहापटीने वाढविण्यात आली आहे.नागरिकांवरील होणार हा अन्याय दूर करून अतिरिक्त कर आकारणी मागे घेण्यात यावी याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने नगरसेवक दाणेश साखरे यांचे नेतृत्वात नगराध्यक्षा मंजुषा बारसागडे यांना शुक्रवारी (८) निवेदन देण्यात आले.
नगरपंचायतने प्रस्तावित केलेली मालमत्ता कर आकारणी नागरिकांची लूट करणारी आहे.यामध्ये शिक्षण कर,वृक्ष कर,रोजगार हमी कराच्या नावाखाली नागरिकांवर अन्यायकारक कर आकारणी केली आहे.या कर आकारणीवर आक्षेप नोंदण्यासाठी नगरपंचायतने ७ डिसेंबर पर्यंत मुदत दिली होती. हजाराच्या स्वरूपात नागरिकांनी आक्षेप सादर केले. निवासी पेक्षा व्यावसायिक कर आकारणी ही दहापटीहून अधिक आहे.याचा परिणाम भाडेकरू व्यवसायिकांवर पडणार आहे.कोरोना काळापासून शहरातील बाजारपेठेत मंदीचे सावट आहे. अनेकांचे व्यापार उद्ध्वस्त झाले आहेत.अशातच नगरपंचायतची ही जुलमी मालमत्ता करआकारनी जखमेवर मीठ चोळणारी आहे. नागरिकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन नगरपंचायतने मालमत्ता कर आकारणी मागे घ्यावी या मागणीचे निवेदन नगराध्यक्ष बारसागडे यांना सादर केले.यावेळी नगरसेवक दाणेश साखरे,माजी जीप सदस्य किरण कांबळे,शालिक हातझाडे,आर.के.जांभुळकर, माधुरी पिंपळकर,सुरैया भोवते,चित्रलेखा मिश्रा, त्रिसरण शहारे,दिवाकर शहारे, अर्चना बनसोड आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.