रविवारी बुद्धिस्ट परिचय मेळाव्याचे आयोजन

0
16

गोंदिया-(ता.9)-येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मरारटोली गोंदिया येथे बुद्धिस्ट समाजातील विवाहयोग्य युवक युवतींचा परिचय मेळावा येणाऱ्या रविवारी (ता.10) आयोजित करण्यात आला आहे.सदर कार्यक्रमाचे आयोजन भीमघाट स्मारक समिती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्व.जयंती उत्सव समिती गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
विवाहयोग्य युवक युवतींना विवाहासाठी योग्य स्थळ शोधताना पालकांना मोठा त्रास होत असते. अनेक अडचणींना तोंड दिल्या नंतरच आपल्या पाल्यांसाठी योग्य स्थळ शोधता येतो.लग्न जुळवण्यासाठी होणारा त्रास कमी करण्यासाठी सदर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून यातील लग्न जुळणाऱ्या युवक युवतींच्या इच्छेनुसार त्यांना मे महिन्यात भीमघाट परिसर येथे आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होता येणार आहे. तरीपण बुद्धिस्ट(बौध्द )समाजातील पालकांनी व विवाहयोग्य युवक युतींनी या मेळाव्यात जास्तीत जास्त सहभाग नोंदवुन लाभ घ्यावा असे आव्हान भीमघाट स्मारक समिती तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्व.जयंती उत्सव समिती गोंदिया यांच्या वतीने करण्यात आले आहे.