तिरोडा:- विधानसभा क्षेत्रात सिंचन विकासाबरोबर रस्ते विकास होवून नागरिकांना रहदारी सोयीस्कर करण्याच्या हेतूने तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहागंडाले यांनी केलेल्या प्रयत्नामुळे नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये पूरक मागण्यांत क्षेत्रातील रस्ते व पूल बांधकामाकरिता एकूण ४७.८८ कोटी मंजूर झाले. यामध्ये प्रामुख्याने अर्जुनी खैरलांजी चांदोरी बघोली रस्त्यावर लहान पूल बांधकाम ३.०९ कोटी रुपये, बोदा सोनेगाव डब्बेटोला रस्ता मजबुतीकरन १.०० कोटी, गोंडमोहाडी- बोदा -कारुटोला-झाडूटोला रस्ता मजबुतीकरन १.२० कोटी, धापेवाडा-अत्री-बोदा-सेजगाव रस्ता मजबुतीकरण १.०० कोटी, ठाणेगाव-डोंगरगाव -सुकडी- बेरडीपार वडेगाव रस्ता मजबुतीकरण १.५० कोटी, सरांडी -खोडगाव-बोपेसर-लाखेगाव -मेंढा रस्ता मजबुतीकरन १.७५ कोटी, गोंडमोहाडी – साईटोला-महालगाव रस्ता मजबूतीकरण २.५० कोटी, बेरडीपार – बीबीटोला रस्ता मजबुतीकरण १.७५ कोटी, राष्ट्रीय महामार्ग ७५३ ते चुरडी -चिखली-भिवापूर-इंदोरा रस्ता मजबूतीकरन १५.०० कोटी,बिरोली – सालेबर्डी-उमरी – बिहीरगाव रस्ता मजबुतीकरन ७२.०० लक्ष, बेलाटी -धादरी -सरांडी -खोपडा रस्ता मजबुतीकरण १.०० कोटी, तांडा-दवडीपार – मोहगाव बु.-तुमखेडा रस्ता मजबुतीकरण ५.०० कोटी, किंडगीपार – पांगडी -निलागोंदी रस्ता मजबुतीकरण २.६० कोटी, पूरगाव – सटवा- रस्ता मजबुतीकरण १.०० कोटी, बोटे- सोनी रस्ता मजबुतीकरण १.०० कोटी, शहारवाणी – धानूटोला रस्ता मजबुतीकरण १.०० कोटी, रामाटोला-मलपुरी-कु-हाडी-मेगाटोला – पाथरी रस्ता ६०.०० लक्ष तसेच आदिवासी क्षेत्रातील सोनेखारी नवेझरी नांदलपार कोडेलोहारा सर्रा रस्त्याचे मजबुतीकरणाकरिता ३.३० कोटी असे एकूण ४७.८८ कोटी मंजूर झाले आहेत.