पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा गोंदिया जिल्हा दौऱ्यावर

0
61

गोंदिया, दि.22 : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम हे दोन दिवस जिल्ह्याचे दौऱ्यावर असून 22 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 1.30 वाजता आमगाव येथे आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण (राखीव). दुपारी 3 ते सायंकाळी 5 पर्यंत तहसिल कार्यालय आमगाव येथे जनता दरबार कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 5.15 वाजता आमगाव येथील स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 5.45 वाजता आमगाव येथून मोटारीने गोंदियाकडे प्रयाण. सायंकाळी 6 वाजता गोंदिया येथील अटल क्रिडा महोत्सवास भेट. सायंकाळी 6.30 वाजता शासकीय विश्रामगृह गोंदिया येथे आगमन व मुक्काम.

          दिनांक 23 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 8.45 ते 9.45 पर्यंत नेहरु चौक, केटीएस हॉस्पीटलच्या बाजुला, गोंदिया येथे अहिंसा द्वार भूमिपूजन सोहळा तसेच नगरपरिषद गोंदिया द्वारे स्वयंचलित शवदाहिनी यंत्राचे ऑनलाईन लोकार्पण. त्यानंतर रेल्वे मार्गावरील उड्डाण पुलाचे भूमीपूजन सोहळा. सकाळी 10 ते दुपारी 1 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थिती. दुपारी 1 ते 2 पर्यंत राखीव. दुपारी 2 ते 2.30 पर्यंत कालवा सल्लागार समितीची बैठक. दुपारी 2.30 वाजता गोंदिया विमानतळाकडे मोटारीने प्रयाण. दुपारी 3.30 वाजता गोंदिया येथून विमानाने मुंबई कडे प्रयाण