
गोंदिया, दि.22 : राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे हया शनिवार 23 डिसेंबर 2023 रोजी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. दुपारी 2.15 वाजता मोहाडी, जि.भंडारा येथून शासकीय वाहनाने गोंदिया कडे प्रयाण. दुपारी 3.30 वाजता धोटे बंधू विज्ञान महाविद्यालय गोंदिया येथे आगमन व राखीव. दुपारी 3.45 वाजता धोटे बंधू विज्ञान महाविद्यालय गोंदिया येथून शासकीय वाहनाने सडक अर्जुनी कडे प्रयाण. दुपारी 4.30 वाजता सडक अर्जुनी येथे आगमन व महिला मेळावा कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 6.00 वाजता सडक अर्जुनी येथून शासकीय विश्रामगृह नागपूरकडे प्रयाण.