नगरपंचायत क्षेत्रात वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ नागरिकांना द्या-नगरसेवक दानेश साखरे

0
39

अर्जुनी मोर.,-राज्य सरकारने महाराष्ट्रातील तालुका स्तरावरील सर्व ग्रामपंचायतींना नगरपंचायतींचा दर्जा बहाल केला.यानुसार अर्जुनी ग्रामपंचायतचे २०१५ ला नगरपंचायत मध्ये रूपांतर झाले.ग्रामपंचायत काळात या क्षेत्रातील नागरिकांना शासनाच्या विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ मिळत होता.ग्रामपंचायतींचे नगरपंचायत मध्ये रूपांतर झाल्याबरोबर शहरी भागाच्या नावाखाली नागरिकांना मिळणारे लाभ गोठवण्यात आले.ग्रामपंचायत स्तरावरील ग्रामस्थांना मिळणारा लाभ नगरपंचायत अंतर्गत येणा-या नागरिकांनाही मिळण्यात यावा अशा आशयाचे निवेदन अर्जुनी नगरपंचायतचे नगरसेवक दानेश साखरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अधिवेशनात भेटून निवेदन दिले.
ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाले म्हणजे स्थानिक लाभार्थ्यांचा आर्थिक स्थर उंचावला असा शासनाचा समज झाला मात्र नागरिकांची परिस्थिती बेताची आहे.
२००९ पासून वन हक्काचे प्रकरणे प्रलंबित असल्याने हजारो लाभार्थी शासकीय योजना पासून वंचित आहेत.ही प्रकरणे तात्काळ निकाली काढावी.वैयक्तिक लाभाच्या सर्व योजना लागू कराव्या.
आजही नगरपंचायत क्षेत्रातील नागरिकांची स्थिती जैसे थे आहे.या जनहिताच्या मुद्यांना आपल्या स्थरावरून जनतेला न्याय मिळवुन द्यावा.
‘क’ वर्गाच्या नगरपंचायत स्तरावर बंद असलेली मनरेगाची कामे सुरू करणे, जिल्हा नियोजन समिती आणि समाज कल्याण विभागामार्फत मिळणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजना सुरू करणे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आणि धडक सिंचन योजनेचा लाभ सुरू करणे,आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने मिळणारे लाभ सुरू करणे,
शौचालय,घरकुलांचा लाभ नमुना आठ अ’ नुसार देणे, आणि आखीव पत्रिकेची अट रद्द करून लाभाच्या योजनांची गती वाढवणे, पशुसंवर्धन,कृषी विभाग आणि महिला व बालकल्याण विभागाच्या योजनांचा लाभ सुरू करणे,वन हक्क कायद्यातील ७५ वर्षाची अट रद्द करून अतिक्रमण धारकांची प्रकरणे निकाली काढण्यात यावे.नगरपंचायतने आर्थिक वर्ष 2023-24 ते 26-27 करिता अवाढव्य चतुर्थ वार्षिक करआकारणी केली.या करआकारणीने नागरिकामध्ये असंतोष निर्माण झाला असल्यामुळे ही करआकारणी रद्द करण्याचे निर्देश द्यावे.नगरपंचायत क्षेत्रातील गाव तलाव आणि शमशान भूमी तलाव सौंदर्यीकरणासाठी निधी उपलब्ध करून समस्या निकाली काढन्यासाठी मदत करण्याची मागणी नगरसेवक दानेश साखरे यांनी मुख्यमंत्र्याकडे केली.