
भंडारा दि. 22 : जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची सभा अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीपती मोरे यांचे अध्यक्षतेखाली काल घेण्यात आली. या बैठकीत ग्राहक हिताच्या दृष्टीने आवश्यक मुद्दयांवर चर्चा झाली. तसेच मागील बैठकीत प्राप्त तक्रारीचे निराकरण करण्यात आले.
बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांच्यासह शासकीय सदस्य एम.डी. तोंडरे वैद्यमापनशास्त्र, प्रशांत भोंगाडे सहायक अभियंता , म.रा.वि.वि. सुनिल नि.गडमडे, वि.अ.(सा.)साप्रवि, जि.प., निलेश जगताप उप प्रादेशिक परिवहन, अधिकारी ,मोनिका धवड अन्न व औषध प्रशासन ,संगिता माने जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी व अशासकीय सदस्य स्वप्नील थानथराटे, धंनजय मुलकलवार, रविंद्र तायडे, चंद्रशेखर साठे, हेमंत साकुरे , अनिल शेंडे, कृष्णा खेडीकर, नितिन काकडे, हर्षल वंजारी, अभिजीत वंजारी, डॉ. नितिन तुरस्कर, जयंत सबजीवाले, प्रा. डॉ.जयश्री सातोकर, प्रा. डॉ.अनिता महाजन (जायस्वाल)व गॅस कपंनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.