
बालाघाट जिल्ह्यातील कंटगी थाना येथे आयोजन
गोंदिया : पवारी साहित्य कला संस्कृति मंडळाच्या वतीने अखिल भारतीय पवारी/पोवारी साहित्य संमेलनाचे आयोजन नजिकच्या बालाघाट जिल्ह्यातील कटंगी थाना येथील भोज पवार मंगल भवन येथे २४ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे.
संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ.ज्ञानेश्वरी टेंभरे राहणार आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून डॉ.टी.एस.पवार तर उद्घाटन कंटगी (मप्र) चे आमदार गौरवसिंह पारधी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी राष्ट्रीय पवांर क्षत्रिय महासभेचे अध्यक्ष इंजी. मुरलीधर टेंभरे,महासचिव पुष्पा बिसेन, डॉ.प्रदिप बिसेन, हिरालाल बिसेन, डॉ.तुफानसिंह पारधी, डॉ.गौरीशंकर टेंभरे, मिनेश कुमार हरीणखेडे, लेखसिंह राणा, युवराज हिंगवे, प्रा.रूपलाल राणा आदि मान्यवर उपस्थित होणार आहे.
संमेलन दरम्यान प्रथम सत्रात ग्रंथदिंडी व कला प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. दुसर्या सत्रात उद्घाटन समारंभ, स्वागत, सत्कार, ग्रंथ विमोचन, तिसर्या सत्रात परिचर्चा, चौथ्या सत्रात कवि संमेलन, पाचवे सत्रात चर्चा, पुरस्कार सन्मान व समारोप आदि कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.