नागपूर ,दि.6- आदिम संविधान संरक्षण समितीच्या वतीने आज सोमवारला येथील संविधान चौकात आरक्षणाच्या मागणीकरिता आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन समितिच्या अध्यक्षा एड. नंदा पराते यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यावेळी नंदा पराते यांनी सांगितले की, आदिवासी समाज भारताचा मूळनिवासी समाज आहे. तरी देखील यांच्या मध्येच सामील असलेल्या हलबा समाजाला आरक्षणातुन वगळण्यात आले आहे. सोबतच या समाजाचे जात प्रमाणपत्राचे अर्ज देखील स्वीकारण्यास मनाई केली जात आहे.