अर्जुनी मोर.:– पुरोगामी महाराष्ट्राला साधु संत व महापुरुषांची वैभवशाली परंपरा लाभली आहे. महाराष्ट्राच्या या मातीतून संत महापुरुषांच्या विचारांचा सुगंध दरवळतो आहे. इतर राज्यांना हेवा वाटावा अशी संस्कृती महाराष्ट्राने जपली आहे. साधु संत व महापुरुषांचे विचार प्रत्येक माणसाला कर्तबगार करणारे आहेत या विचारांनीच माणसाची प्रगती होत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी खंजिरीवर थाप मारून आपल्या भजनाचे माध्यमातून महाराष्ट्रातील तरुणांना स्वातंत्र्यलढ्यासाठी नवीन ऊर्जा निर्माण केली. ग्रामगीतेच्या माध्यमातून मोठी सामाजिक क्रांती केली .आज त्यांच्याच विचारांवर व महापुरुषांच्या विचारावरच राष्ट्रसंत सत्यपाल महाराज आपल्या अमृतवाणी कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला जागे करण्याचे काम करीत आहेत. आज लायकराम भेंडारकर मित्र परिवाराचे वतीने संत नगरी इंजोरी सारख्या गावात परिसरातील गुणवंत विद्यार्थी व जेष्ठ नागरिक तथा शासकीय सेवेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या लोकांचा सत्कार होणे ही पुरोगामी महाराष्ट्राची शान आहे. हा कार्यक्रम म्हणजे माणसाला माणूस बनविण्याचा कारखाना म्हणजे साधुसंत महापुरुष आहेत. याच धरतीवरचा असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री इंजि. राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले आहे.
तालुक्यातील संतनगरी इंजोरी येथे गोंदिया जिल्हा परिषद चे गटनेते व बोंडगाव देवी क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य लायकराम भेंडारकर मित्र परिवाराचे वतीने स्व. चत्रुभाऊ भेंडारकर यांचे स्मृती प्रित्यर्थ सत्यपाल महाराज किर्तन कार्यक्रम व गुणवंत विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, शैक्षणिक, आरोग्य व विविध शासकीय सेवेत उत्कृष्ट कार्य करणारे तथा पत्रकार यांचे सत्कार कार्यक्रमात( ता. सात ) माजी मंत्री बडोले बोलत होते. कार्यक्रमाला शुभांगी सुनील मेंढे, गटनेते लायकराम भेंडारकर, भाजपा तालुका अध्यक्ष विजय कापगते, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रत्नदीप दहिवले, जिल्हा परिषद सदस्य कविता रंगारी, पौर्णिमा ढेंगे, जयश्री देशमुख, सभापती सविता कोडापे, पं. स. सदस्य संदीप कापगते, डॉ. नाजूक कुंभरे, पुष्पलता द्रुगकर, कुंदाबाई लोगडे, कलाकार परिषदेचे अध्यक्ष जीवन लंजे, डॉ. गजानन डोंगरवार ,राजहंस ढोक, डॉ. कुंदन कुलसुंगे, शारदा नाकाडे व अन्य मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वप्रथम थोर महापुरुष व स्व. चत्रुभाऊ भेंडारकर यांचे प्रतीमे समोर दिपप्रजल्वित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली., गुणवंत लोकांचा सत्कार करणे मागची भूमिका विशद करताना आयोजक लायकराम भेंडारकर म्हणाले की बोंडगाव देवी जिल्हा परिषद क्षेत्रातील प्रत्येक गावात गुणवंत व प्रज्ञावंत माणसं दडलेली आहेत. त्यांचा कुठेतरी सन्मान व्हावा व या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची संधी उपलब्ध व्हावी तसेच सत्कार मूर्तीच्या कार्यक्रमातून इतरांनी प्रेरणा घ्यावी व विकास कामाला गती यावी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. असल्याचे सांगितले, सर्वप्रथम तालुक्यातील ज्येष्ठ श्रेष्ठ व गुणवंत विद्यार्थी, पत्रकार ,डॉक्टर, शिक्षक, ग्रामसेवक, व होतकरू अशा शेकडो लोकांचा शाल श्रीफळ व स्व. चत्रुभाऊ भेंडारकर स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी शुभांगी सुनील मेंढे यांनी भारतीय संस्कृती जपून मानवता धर्म टिकून ठेवणे प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सांगितले, यानंतर राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी आपल्या गोड अमृतवाणीतून अंधश्रद्धा निर्मूलन, बेटी बचाव बेटी पढाव, ग्राम स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती अशा विविध विषयावर हजारो प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले, प्रस्ताविक दीपंकर ऊके, संचालन नमिता लोथे (लंजे ), लाकेश्वर लंजे तर आभार मुख्याध्यापक विठोबा रोकडे यांनी केले.