
वाशीम दि.३०– सहाय्यक संचालक आरोग्य सेवा आणि कुष्ठरोग कार्यालय,वाशीम यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी पुण्यतिथी व जागतिक कुष्ठरोग दिनानिमीत्त आज ३० जानेवारी रोजी वाशीम येथे ‘रन फॉन लेप्रसी’ या मॅरॅथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.३ किमी अंतराच्या या मॅराथॉन स्पर्धेत पुरूष व महीला गटातील विजयी स्पर्धकांना पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. पुरुष गटात प्रथम सचिन खोरणे, द्वितिय अक्षय मस्के,तृतीय रामा पदमने तर महिला गटामधुन प्रथम साक्षी घुले,द्वितिय शितल ठाकूर तर तृतीय क्रमांक वैष्णवी आहेवर यांनी प्राप्त केला.विजयी स्पर्धकांना प्रथम ४ हजार रुपये,द्वितिय २ हजार ५०० रुपये आणि तृतीय १ हजार ५०० रुपयांचे बक्षीस मान्यवरांचे हस्ते देण्यात आले.यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुहास कोरे,सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग डॉ. सतिष परभणकर,वैद्यकिय अधिकारी डॉ.बालाजी हरण,अस्थिरोग तज्ञ डॉ. वैभव मेसरे,डॉ.अनिल रुईकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक रामदास गवई,कार्यक्रम व्यवस्थापक समाधान लोनसूने,पर्यवेक्षक अशोक भगत,अवैद्यकिय सहाय्यक महेंद्र खरतडे,कुष्ठरोग तंत्रज्ञ,अण्णासाहेब घुमरे,भारत ठाकरे,निलेश राठोड, किशोर कराळे,गोविंद पाटील, श्रीकृष्ण जाधव,प्रदुमन सदार,शुभम माहुलकर,गोपाल गंगावणे,उपचार पर्यवेक्षक निलेश पाटिल,रविंद्र बर्वे, संतोष बल्हाल,प्रमोद बावणे,नकुल ढोके,रामेश्वर साळुंके,गणेश रघुवंशी, परीचर किर्लाेस्कर,लगड व जाधव इत्यादींची परिश्रम घेतले.