Home विदर्भ आदिवासी वसतिगृहाच्या महिला वॅार्डनसाठी विद्यार्थिनींचे खासदार अशोक ‌नेते यांना साकडे..

आदिवासी वसतिगृहाच्या महिला वॅार्डनसाठी विद्यार्थिनींचे खासदार अशोक ‌नेते यांना साकडे..

0

सहायक आयुक्तांचा सकारात्मक प्रतिसाद…

गडचिरोली : येथील शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहाच्या प्रभारी गृहपाल (वॅार्डन) गीता झुरमुरे यांचा वसतिगृहातील मुलींना चांगलाच लळा लागला आहे. नुकतीच त्यांच्या जागी चंद्रपूर जिल्ह्यातून पदोन्नतीने बी.डी.धाईत या महिला गृहपालाची नियमित नियुक्ती करण्यात आली. परंतू धाईत यांच्या ऐवजी गीता झुरमुरे यांनाच नियमित गृहपाल म्हणून नियुक्ती द्या, असे साकडे सर्व विद्यार्थिनींनी खा.अशोक नेते यांना घातले. खा.नेते यांनी त्यांच्या मागणीची दखल घेऊन लगेच नागपूर येथील आदिवासी विकास विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांसोबत भ्रमणध्वनीवर संपर्क करून विद्यार्थिनींच्या भावनांची दखल घ्यावी अशी सूचना केली. त्याला आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने विद्यार्थिनींनी समाधान व्यक्त केले.

या वसतिगृहांमध्ये अकरावी ते पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंतच्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनी राहतात. गृहपाल झुरमुरे सर्व विद्यार्थिनींना मुलीसारख्या वागवतात. त्यांचे सर्व प्रकारची काळजी घेतात. वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये मुलींना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देतात. आईच्या मायेने त्या वागवत असल्याने परीक्षेच्या तोंडावर त्यांना दूर सारू नका, अशी विनंती मुलींनी भाजपच्या प्रदेश सचिव रेखा डोळस यांच्यासह जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष गीता हिंगे, माजी सभापती रंजिता कोडापे, जिल्हा सचिव वर्षा शेडमाके या पदाधिकाऱ्यांकडे केली. त्यांनी त्या मुलींची खा.अशोक नेते यांच्याशी भेट घालून दिली. मुलींचे म्हणणे ऐकून घेऊन खा.नेते यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दखल घेऊन योग्य तोडगा काढण्याची सूचना केली. त्यावर अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

Exit mobile version