ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे ऑल इंडिया व्हिलेज वर्कर्स फेडरेशनचा विस्तार होणार

0
31

गोंदिया-आयटकशी संलग्न ग्रामपंचायत कामगारांच्या ऑल इंडिया व्हिलेज पंचायत वर्कर्स फेडरेशनचा विस्तार होत असून लवकरच देशातील सर्व राज्यांमध्ये त्याच्या शाखा स्थापन करण्यात येणार आहेतअसा विश्वास फेडरेशनचे राष्ट्रीय सचिव तथा राज्याचे कार्याध्यक्ष मिलिंद गणवीर यांनी व्यक्त केला आहे.त्यांनी सांगितले की देशातील सर्व राज्यांमध्ये कामगारांचें वेतन वेगवेगळे आहे.उत्तर भारतातील राज्यांमध्ये या कामगारांना किमान वेतन नसल्याने ते वेठबिगारी कामगारां सारखी कामे करतात व दारिद्र्य रेषेखालील हलाखीचे जीवन जगत आहेत. या सर्व परिस्थितीला समजून घेऊन आयटकने त्यांचे अखिल भारतीय संघटन उभारण्याची गरज ओळखून 23-24 सप्टेंबर 2022 ला गोव्यात अखिल भारतीय स्थापना परिषद आयोजित करून अखिल भारतीय ग्रामपंचायत कामगार महासंघाची स्थापना केली आहे, ज्याची पदाधिकारी बैठक नुकतीच नाशिक येथे राष्ट्रीय अध्यक्ष क्रिस्टोफर फोन्सेका (गोवा) यांच्या अध्यक्षतेखाली झाली.त्यात सरचिटणीस कॉ. नामदेव चव्हाण यांनी इतिवृत्त मांडले यात बैठकीत गोवा, महाराष्ट्र, तेलंगणा, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, केरळ आदी राज्यांतील पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीत केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा वाटा मिळणे, वित्त आयोगातून वेतणाची तरतूद , सर्व राज्यांसाठी केंद्रीय स्तरावरील वेतनश्रेणी, कर्मचाऱ्यांचा दर्जा आदीं बाबतचे प्रश्न केंद्रीय ग्रामविकास मंत्री कडे आयटक चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. खासदार कॉ. विनय विश्वम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाची बैठक आणि फेडरेशनच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची हैदराबाद येथे बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले .या बैठकीत नामदेव चव्हाण,प्रा. तानाजी ठोंबरे, मिलिंद गणवीर, सखाराम दुर्गुडे,प्रसन्ना उटगी, ऍड. राहुल जाधव,मो. युसूफ, रुपेश नाईक,मंगेश म्हात्रे, एम. राधाकृष्णन, टी. दांडापानी आदी पदाधिकारी उपस्थित होते.