Home विदर्भ श्रीकृष्ण गोरक्षण गोशाळेत विविध विकास कामाचे भूमिपूजन

श्रीकृष्ण गोरक्षण गोशाळेत विविध विकास कामाचे भूमिपूजन

0

गोंदिया,दि.27– पांजरापोल येथील श्रीकृष्ण गोरक्षण सभेच्या गोशाळेत खा. प्रफुल्ल पटेल यांच्या स्थानिक विकास निधीतून विविध विकास कामांचे भूमिपूजन माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते करण्यात आले.
खा. प्रफुल्ल पटेल यांच्या खासदार स्थानिक विकास निधीतून श्रीकृष्ण गोरक्षण सभेच्या गोशाळेची आवारभिंत, दोन सभागृह बांधकामाकरिता 25 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या विकास कामाचे भूमिपूजन करताना माजी आ. जैन म्हणाले, गौमातेची सेवा करण्याची संधी मिळाली हे मी आमचे सौभाग्य समजतो.

भविष्यातसुध्दा आम्ही नि:स्वार्थ भावनेने गौमातेच्या व श्रीकृष्ण गौरक्षण सभा प्रगतीकरीता कार्य करीत राहणार असल्याचे आश्‍वासन दिले.यावेळी माजी आमदार गोपालदास अग्रवाल, शुभांगी मेंढे, श्रीकृष्ण गोरक्षण सभेचे अध्यक्ष दामोधर अग्रवाल, ट्रस्ट बोर्ड अध्यक्ष अजय अग्रवाल, बालकिसन शास्त्री, शंकरलाल अग्रवाल, आकेश अग्रवाल, आनंद अग्रवाल, शितल मुरारका, नानू मुदलियार, रौनक ठाकूर आदी पदाधिकारी व विश्‍वस्त मंडळ उपस्थित होते. संचालन अपूर्व अग्रवाल यांनी केले. श्रीकृष्ण गौरक्षण सभाव्दारा आयोजित श्री गोपाष्टमी उत्सवात माजी आ. राजेंद्र जैन यांनी गौशाळेच्या विकासासाठी खा. प्रफुल्ल पटेल यांच्या खासदार स्थानिक विकास निधीतून 25 लाख रुपयांचा निधी देण्याचे आश्‍वासन दिले होते. ते आश्‍वासन जैन यांनी पाळले.

Exit mobile version