Home विदर्भ वर्धा जिल्ह्यात नोंदणीत आढळले ‘हे’ पक्षी

वर्धा जिल्ह्यात नोंदणीत आढळले ‘हे’ पक्षी

0

वर्धा : आंतरराष्ट्रीय स्तरावर दरवर्षी पक्षीगणना होते. ती ग्रेट बँकयार्ड बर्ड काउन्ट म्हणून ओळखल्या जात असते. त्याचे औचित्य साधून पक्षी निरीक्षकांनी मोहीम राबविली होती. देशातील ३७ राज्यांनी त्यात भाग घेतला. ३८९ पक्षी प्रजातीसह महाराष्ट्र पाचव्या स्थानावर आला. तर राज्यात वर्धा जिल्हा १३ व्या स्थानावर आहे.चार दिवसात चाळीस पक्षी दिसून आले. जिल्ह्यात एकूण १४६ पक्ष्याची नोंद झालेली आहे. पक्षी अभ्यासक राहुल वकारे व पवन दरणे यांना बोर धरण परिसरात लीफ बर्बलर हा पक्षी प्रथमच दिसला. त्यामुळे पक्षी वैभवात भर पडल्याचे ते म्हणतात. आययुसीएन या जागतिक संघटनेने केलेल्या वर्गीकरणनुसार असुरक्षित गटातील नदी सुरय, संकट समीप गटातील मोठा करवानक, काळ्या शेपटीचा पाण टिवला, तिरंदाज, काळा शराटी, पांढऱ्या मानेचा करकोचा, करण पोपट हे आढळले.पक्षीमित्र संघटनेचे दिलीप विरखेडे, डॉ. चेतना उगले, मनीष ठाकरे, सफल पाटील, श्रीकांत वाघ, शंतनू बोरवार, प्रियंका नेहेते, प्रकाश भोयर, विनोद साळवे यांनी नोंदी घेतल्या. संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर तसेच डॉ. गजानन वाघ, किरण मोरे, डॉ. सुधाकर कुऱ्हाडे, माजी वनपाल, अशोक भाणसे, प्रशांत काकडे, अविनाश भोले यांनी मार्गदर्शन केले. पक्षी निरीक्षण रोठा तलाव, बोर प्रकल्प, सारंगपुरी तलाव, दिग्रस व मदन जलाशय, कस्तुरबा रुग्णालय या परिसरात झाले.

Exit mobile version