महिलांना बिचारी अबला म्हणणे थांबवा-धनिषा कटरे यांचे प्रतिपादन

0
40

*गोंदियात जागतिक महिला दिन उत्साहात*
गोंदिया ता.12:-जिजामातेने शिवाजी महाराजांना छत्रपती म्हणून घडविले, माता भीमाईचा बाळ भीमराव हे भारताचे डॉ बाबासाहेब आंबेडकर झाले, तर कल्पना चावला खगोल शास्त्रज्ञ होऊन अंतराळात गेल्या, देश घडवीण्याचं महान कार्य महिलांनी केलेले आहे. परिणामी महिलांना बिचारी अबला, कमजोर असे म्हणणे थांबवा असे आवाहन पवार प्रगतीशील मंच अंतर्गत महिला समितीच्या अध्यक्ष धनिषाताई कटरे यांनी (ता.10) केले.
येथील पवार सांस्कृतिक भवनाच्या सभागृहात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्यां आणि माजी जिल्हा परिषद सदस्य सीता रहांगडाले या होत्या. मंचावर सत्कार्मुर्ती मीनाक्षी कटरे, प्रतिमा पटले, प्रिती टेम्भरे, अंजली ठाकूर, वंदना कटरे, छाया पारधी, विद्या बिसेन, डॉ प्रिती देशमुख आणि रश्मी रहांगडाले उपस्थित होते.
पुढे बोलताना श्रीमती कटरे यांनी महिला शक्तीची प्रशंसा केली.
*”कोमल है कमजोर नही!*
*शक्तिका नाम ही नारी है!*
*जगको जीवन देनेवाली!मौत भी तुझसे हारी है!!*
आणि म्हणूच पाय कपले असतांना अरुणीमा सिन्हा यांनी एव्हरेस्ट पर्वत सर केला., इंग्रजांशी लढून ‘मेरी झांसी नही दूंगी’ असे झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांनी ठणकावून सांगितलं.
महिला ही आई,बेटी, पत्नी, असून ती आत्मपूर्ण आहे, हिनदीन नाही असे त्या म्हणाल्या,यावेळी मंचवर उपस्थित मान्यवरांनी आपले विचार मांडले.
संचालन उर्मिला रहांगडाले, स्नेहा गौतम यांनी केलं, आभार आरती पारधी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोरेश्वरी बिसेन, दयावती येडे, आरती पारधी, दीप्ती पटले, पूजा टेम्भरे, शेफाली बिसेन,स्वाती बिसेन, आरती चौधरी, एकता येडे तसेच महिला समितीच्या सर्व भगिनींनी सहकार्य केले.
या कार्यक्रमात मोठया संख्येने महिला उपस्थित होत्या.