नागपूर, दि. 4 एप्रिल 2024:- महावितरणच्या प्रादेशिक स्तरावरील आंतरपरिमंडलीय नाट्य स्पर्धा 5 व 6 एप्रिल 2024 रोजी अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सभागृहात होणार आहे. या स्पर्धेत महावितरणच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयांतर्गत चार परिमंडलांतर्फे नाटकांचे सादरीकरण होणार आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी (5 एप्रिल) सकाळी साडे नऊ वाजता महावितरणच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयाचे संचालक सुहास रंगारी यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी हे राहतील. याप्रसंगी गोंदिया परिमंडलाच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण,चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे,अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेत शुक्रवारी (5 एप्रिल) सकाळी 11 वाजता उदय नारकर लिखीत नागपूर परिमंडलाचे ‘खर सांगायचं तर’ हा नाट्यप्रयोग सादर करण्यात येईल. त्यानंतर दुपारी 3 वाजता गोंदिया परिमंडलाचा संजय जिवने लिखीत ‘चक्रांत’ हा नाट्य प्रयोग होणार आहे. शनिवारी (06 एप्रिल) सकाळी 10 वाजता प्रसाद दाणी लिखीत अकोला परिमंडलाचे ‘नथींग टू से’ हे नाटक सादर होणार आहे आणि दुपारी 2 वाजता अमेय वि. दक्षिणदास लिखीत चंद्रपूर परिमंडलाचे ‘द फियर फॅक्टर’ या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण करण्यात येईल.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण शनिवारी (6एप्रिल) सांयकाळी 5 वाजता प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी हे राहतील. याप्रसंगी गोंदिया परिमंडलाच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण,चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे,अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येने या प्रयोगांना उपस्थित राहून महावितरणच्या कलावंतांना प्रोत्साहित करण्याचे आवाहन स्पर्धेचे कार्याध्यक्ष तथा अमरवती परिमंडलाचे मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी यांनी केले आहे.