Home विदर्भ धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

0

गोंदिया,दि.१४ः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आबेंडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचालित धोटे बंधू विज्ञान महाविद्यालय तर्फे कार्यक्रमाचे आयोजन गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव राजेंद्र जैन,संचालक निखिल जैन,प्राचार्य डॉ.अंजन नायडू आणि उपप्राचार्य डॉ.जयंत महाखोडे यांच्या मार्गदर्शनात जयंतीच्या पूर्वसंध्येला करण्यात आले होते. कार्यक्रमांमध्ये परिसंवाद स्पर्धा,निबंध लेखन स्पर्धा आणि पुस्तक मेळा यांचा समावेश होता, ज्यात विद्यार्थी आणि प्राध्यापकांचा उत्साहपूर्ण सहभाग होता.
कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली.डॉ. अंजन नायडू यांनी बाबासाहेबांचा भारतीयांना दिलेला मोलाचा वाटा या विषयांवर आपले मत मांडले.धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाने आयोजित केलेल्या चर्चासत्रात अभ्यासपूर्ण निबंध आणि पुस्तक मेळा याद्वारे, बाबासाहेबांनी स्वीकारलेल्या सामाजिक न्याय, समानता आणि सक्षमीकरणाच्या आदर्शांचा सन्मान करण्यात आला.पुस्तक मेळ्यात उपस्थितांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन, कार्य आणि तत्त्वज्ञान यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या विविध साहित्यकृतींचा समावेश होता.
परिसंवाद स्पर्धेचे परीक्षण प्रा. अश्विनी मेश्राम आणि डॉ. सोनल वर्मा यांनी केले तर निबंध लेखन स्पर्धेचे परीक्षण डॉ. सुषमा  निकोसे आणि डॉ. एल.आर. राणे यांनी केले.परिसंवाद स्पर्धेत कुमारी रुचिका शरणागत आणि निबंध लेखन स्पर्धेत कुमारी पायल महारवाडे आणि कुमारी पल्लवी कटरे या विद्यार्थिनींनी विजेतपदे पटकाविले.
कार्यक्रमाचे संचालन डॉ.स्नेहा जायस्वाल यांनी केले तर डॉ.शशिकांत बिसेन, डॉ.संयुक्त सिगं आणि कुमारी
अवनी मेठी यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमात सर्व कर्मचारी व
विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

Exit mobile version