Home विदर्भ तिल्ली मोहगाव मतदान केंद्रावर तांत्रिक अडचणीमुळे मतदानात अडथळा

तिल्ली मोहगाव मतदान केंद्रावर तांत्रिक अडचणीमुळे मतदानात अडथळा

0

गोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात आज, १९ एप्रिल रोजी सकाळपासुन मतदानाला सुरवात झाली आहे.त्यातच काही मतदान केंद्रावर अडचणी निर्माण झाल्या.तर शहरासह ग्रामीण भागातील काही मतदान केंद्रावर तिनचाकी सायकल व उन्हापासून बचावाची सोय दिसून आली नाही.तर गोंदिया शहरातील मरारटोली मतदान केंद्रावर तर प्रवेशद्वारावर तीनचाकी सायकल असतानाही तिथून मतदारास न नेता सरळ बुथजवळ दुचाकीने मतदारांना नेण्यात येत असल्याचे चित्र बघावयास मिळाले.त्यातच अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या गोरेगाव तालुक्यातील तिल्ली/ मोहगाव मतदान केंद्रावरील बूथ क्रमांक ४८ वर तांत्रिक अडचण निर्माण झाली होती.

   गोरेगाव तालुक्यातील तिल्ली मोहगाव येथील बुथ क्रमांक ४८ वर मतदान केल्यावर ईव्हीएम मशीन मधून वीवीपी पॅट स्लीप निघत नसल्याचे समोर आले. यामुळे मतदारांनी आक्षेप घेतला. त्यामुळे सकाळी ९:३० वाजतापासून मतदान प्रक्रिया बंद पडली. दरम्यानचा तब्बल तीन तास मतदान प्रक्रिया बंद होती. यादरम्यान २६१ मतदान झाले होते.केंद्रावरील अधिकाऱ्यांनी दखल घेत आपल्या वरिष्ठांना कळविल्या नंतर तांत्रिक पथक नवीन वीवीपी पॅट घेऊन या मतदान केंद्रावर पोहचले आणि ती बदलवून दुसरे वीवीपी पॅट मशीन लावल्यानंतर तपासणी करून मतदान सुरळीत होत असल्याची खात्री केली. अशी ही तांत्रिक अडचण दूर केल्यानंतर ११:३० वाजता पासून मतदान प्रक्रिया सुरू झाली. दरम्यान या केंद्रावर सुमारे दोन तास मतदान प्रक्रिया बंद ठेवावी लागल्याची माहिती तिल्ली/ मोहगाव येथील निवडणूक अधिकारी यांनी दिली.

Exit mobile version