Home विदर्भ सहसंचालक डॉ.राधाकिशन पवार यांची गोंदिया जिल्ह्यातील आरोग्य संस्थाना भेटी

सहसंचालक डॉ.राधाकिशन पवार यांची गोंदिया जिल्ह्यातील आरोग्य संस्थाना भेटी

0

गोंदिया- क्षेत्रस्तरावर प्रत्यक्ष भेट देवुन किटकजन्य व जलजन्य आजार कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी राज्यस्तरावरुन विदर्भातील आरोग्य संस्थाचा भेटीचा कार्यक्रम सहसंचालक डॉ.राधाकिशन पवार याच्या अध्यक्षेतीखाली दि.21 एप्रिल ते 28 एप्रिल दरम्यान सुरु झाला आहे. सदर समितीमार्फत विदर्भातील जिल्ह्यातील आरोग्य संस्थाना भेटी देवुन किटकजन्य,जलजन्य,कुष्ठरोग, क्षयरोग, साथरोग,माता व बाल संगोपन ई. विविध कार्यक्रमाचा आढावा घेण्यात येत आहे.
दिनांक 22 एप्रिल रोजी सहसंचालक आरोग्य सेवा (हिवताप,हत्तीरोग व जलजन्यरोग) पुणे डॉ.राधाकिशन पवार यांनी गोंदियातील सडक अर्जुनी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र खोडशिवनी व अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र गोठणगाव येथे विदर्भ दौरा निमित्त भेट देण्यात आली व क्षेत्रस्तरावर प्रत्यक्ष भेट देऊन कीटकजन्य ,जलजन्य आजार, माता बाल संगोपन,कुष्ठरोग,क्षयरोग व साथरोग कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला.
दुपारी तीन वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र खोडशिवनी व संध्याकाळी सहा वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र गोठणगाव येथे भेट देवुन आरोग्य संस्थेमार्फत राबविण्यात येणार्या आरोग्य कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला.त्या सोबतच संस्थेची आतील बाहेरील परीसर स्वच्छता, प्रसुतीकक्ष, वॉर्ड, औषधीसाठा, लसीकरण कक्ष, प्रयोगशाळा,शस्त्रक्रिया कक्ष ई.ची पाहणी केली.
पाहणी दरम्यान सहसंचालक यांनी लोकांना गुणवत्तापुर्वक आरोग्य सेवा देणे, आरोग्य संस्थेत प्रसुतीवर भर, मुख्यालयी वास्तव, आरोग्य योजना गावपातळी पर्यंत पोहचविणे ,आरोग्य कार्यक्रमात लोकांचा सहभाग वाढविणे,साथरोग रोखण्यासाठी गृहभेटी वाढविणे, ई.विविध बाबींवर सुचना देण्यात आल्या.
त्यावेळेस त्यांचे सोबत राज्य कीटक शास्त्रज्ञ पुणे डॉ.महेंद्र जगताप, सहाय्य्क संचालक हिवताप व हत्तीरोग नागपूर डॉ.श्याम निमगडे, सहाय्यक संचालक पुणे डॉ.प्रेमचंद कांबळे, संचालक सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर डॉ.अजय दवले, प्राचार्य आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था नाशिक डॉ.दावल सावळे ,जिल्हा आरोग्य अधिकारी गोंदिया डॉ.नितीन वानखेडे,जिल्हा क्षयरोग अधिकारी गोंदिया डॉ.अभिजीत गोल्हर,जिल्हा हिवताप अधिकारी गोंदिया डॉ.विनोद चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी अर्जुनी मोरगाव डॉ.विजय राऊत, तालुका आरोग्य अधिकारी सडक अर्जुनी डॉ.प्रणित पाटील, खोडशिवनीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.शुभम लंजे, गोठणगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ.देवेंद्र घरतकर व डॉ.मोनाली तर्हेकर तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र खोडशिवनी व गोठणगाव येथिल अधिकारि व कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version