Home विदर्भ स्मरण भिमराया ऑनलाईन स्पर्धेचे पारितोषिक वितरण उत्हासात

स्मरण भिमराया ऑनलाईन स्पर्धेचे पारितोषिक वितरण उत्हासात

0

सडक अर्जुनी,दि.०२ः राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्यावतीने आयोजित स्मरण भीमराया ह्या ऑनलाइन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा १ मे रोजी माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडला.
विश्वरत्न बोधिसत्व भारतीय घटनेची शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन महापरीक्षा 2024, स्मरण भीमराया ह्या ऑनलाइन परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण 2176 स्पर्धकांनी नोंदणी केली होती. 21 मे रोजी घेण्यात आलेल्या ऑनलाइन प्रश्नमंजुषा परीक्षेत 492 परीक्षार्थी सहभागी झाले.अर्ध्या तासाच्या या परीक्षेत 600 पैकी 600 गुण प्राप्त करणारे सात परीक्षार्थी होते. पैकी तीन परीक्षार्थींनी वेळेत आपला फॉर्म सादर केल्याने ते स्पर्धेत पात्र ठरले.स्पर्धकांनी त्यांचा फॉर्म किती वेळेत सादरट केला,यावर त्यांची गुणवत्ता रँक ठरवण्यात आली होती. स्पर्धेत प्रथम क्रमांक संगीता चंदनखेडे राहणार वणी यांची वर्णी लागली.त्यांना तीस हजार रुपये रोख थायलंडून आणलेली बुद्धमूर्ती प्रशस्तीपत्र व शील्ड,द्वितीय क्रमांकासाठी नुशान घनश्याम हुमणे नागपूर यास वीस हजार रुपये रोख, थायलंड इथून आणलेली बुद्धमूर्ती व शील्ड तसेच तृतीय क्रमांकासाठी स्वाती विकास उंदीरवाडे राहणार निलज जिल्हा गोंदिया हिला दहा हजार रुपये रोख थायलंड वरून आणलेली बुद्धमूर्ती प्रशस्तीपत्र व शील्ड पारितोषिक म्हणून देण्यात आले.
सर्वोत्तम दहा स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र व थायलंड वरून आणलेल्या बुद्ध मुर्त्या प्रदान करण्यात आल्या.स्पर्धेचे आयोजन राजकुमार बडोले फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या नेतृत्वात राकेश भास्कर,प्रशांत शहारे, यांनी केले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत धानगाये,माजी सभापती गिरधारी हत्तीमारे,माजी उपसभापती राजेश कठाणे, प्रल्हाद वरठे,तुलाराम येरणे,तुकाराम राणे,रंजनाताई भोई आदी उपस्थित होते.

Exit mobile version