Home विदर्भ महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात,उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सन्मान

महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात,उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सन्मान

0

भंडारा,दि. 2 : महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा भंडारा येथील पोलिस कवायत मैदानावर पार पडला. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी ध्वजारोहण केले. त्यानंतर त्यांनी परेडची पाहणी केली. यावेळी  विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.

          महाराष्ट्र दिनाच्या 64 वा वर्धापन दिनानिमित्त सकाळी 8 वाजता ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलिस दल मानवंदना दिली. परेड निरीक्षण केल्यानंतर परेड संचलन करण्यात आले. महाराष्ट्र दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कुंभेजकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यात जिल्हा पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सौरभ चंद्रकांत घरडे, उपाध्याय सुरेश महादेवप्रसाद, पोलिस हवालदार दिनु डोमाजी मते, पोलिस हवालदार राजेश बळीराम बांते, तलाठी पि.जे. तितीरमारे, डॉ. मनीष बत्रा, जिल्हारुग्णालय भंडारा गौरव करण्यात आला.

          यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जीभकाटे,जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी, जिल्हा चिकित्सक डॉ.दिपचंद सोयाम,अपर पोलीस अधिक्षक इश्वर कातकडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. कमलाकर रणदिवे, निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्र, जिल्हा नियोजन अधिकारी रा.न. बोरकर, व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. स्मिता गालफाडे व मुकूद ठोकर यांनी सूत्रसंचालन केले.

Exit mobile version